मराठी राजभाषा दिन

मराठी राजभाषा दिन

85684


कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना मिळाला उजाळा
मराठी राजभाषा दिन; शहर, जिल्ह्यात व्याख्यानांसह काव्यवाचन कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी आज विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांनी मराठी राजभाषा दिन साजरा केला. व्याख्यानांसह अभिवादन, काव्यवाचन आणि विविध स्पर्धा कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश होता.

राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज
राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये डॉ. विजया वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे, असे मत प्रा. सायरा मुल्लाणी यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. भाग्यश्री पुणतांबेकर, डॉ. शकील शेख, डॉ. एम. डी. कदम, डॉ. संपदा लवेकर, प्रा. गणेश लवंगारे आदी उपस्थित होते. सहायक प्रा. डॉ. महेश रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सविता माजगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अंकुश घुले यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. एल. डी. कदम, उपप्राचार्या प्रा. डॉ. सिंधू आवळे यावेळी उपस्थित होते.

प्रायव्हेट हायस्कूल
प्रायव्हेट हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचा स्मृतिदिन व मराठी राजभाषा दिन असा संयुक्त कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सतीश भोसले होते. वेदांत देसाई याने प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ‘साहित्य सुधा’ या हस्तलिखिताचे अनावरण झाले. ज्येष्ठ शिक्षिका एस. एस. देशपांडे यांनी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. वर्धन कुलकर्णी, वैष्णवी बरगे, नलिका वेदपाठक, रोहन नांगरे यांनी मनोगत व्यक्त केली. शुभम वायंगणकर याने काव्यवाचन केले. शर्वरी कुलकर्णी, केतकी हिरेमठ, आरोही इनामदार यांनी मराठी गौरव गीत व महाराष्ट्र गीतांचे गायन केले. शर्वरी नार्वेकर यांनी आभार मानले. आदर्श शिंदे व सुमेध अकोळकर यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी पर्यवेक्षक पी. एम. जोशी, जिमखानाप्रमुख एस. आर. गणबावले आदी उपस्थित होते.

विद्यापीठ हायस्कूल
विद्यापीठ हायस्कूलमधील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. वाय. कुंभार होते. ए. सी. देसाई यांनी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली. उपमुख्याध्यापिका एस. व्ही. रणनवरे, उपप्राचार्या के. व्ही. भानुसे, पर्यवेक्षक बी. डी. गोसावी, एच. एम. गुळवणी आदी उपस्थित होते.

मिलिंद हायस्कूल
शाहूनगरातील मिलिंद हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक एम. एम. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. सांस्कृतिक विभागप्रमुख बी. एम. नदाफ यांनी प्रास्ताविक केले. एस. डी. पुजारी यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्‍व सांगितले. एन. एम. डाफळे यांनी आभार मानले.

इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूल
प्रिन्सेस इंदुमतीदेवी गर्ल्स हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षिका साधना पोवार यांनी कुसुमाग्रज यांच्या कार्याची माहिती दिली. पर्यवेक्षिका वर्षा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आर्या ढोबळे, श्रुती गुळवणी यांनी सूत्रसंचालन केले. समृद्धी सुतार यांनी आभार मानले. उमा भोसले, संगीता पोवार यांनी संयोजन केले.

विकास विद्यामंदिर
विकास विद्यामंदिर शाळेत मुख्याध्यापक इंदिरा कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. रूपाली घुरके, श्रुती आडूळकर यांनी काव्यवाचन केले. शीतल लांबोरे, सिद्धार्थ गदाई, संदीप लांबोरे यांनी मनोगत व्यक्त केली. कालिदास कोळी यांनी आभार मानले. राजेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले. तानाजी कवडे यांनी सूत्रसंचालन केले.

श्री दत्ताबाळ हायस्कूल
श्री दत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचलित श्री दत्ताबाळ हायस्कूल, श्री दत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिर, श्री दत्ताबाळ शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी दिन साजरा झाला. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, संस्थेचे सचिव नीलेश देसाई, विश्‍वस्त वेद देसाई, व्यवस्थापक संदीप डांगोरे, हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिव डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, मुख्याध्यापिका प्रणिता वर्धमाने आदी उपस्थित होते.

ं‘मनसे’तर्फे मराठी पाट्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शहरातील मराठी पाट्या असणाऱ्या दुकानदारांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. शहर उपाध्यक्ष सुनील तुपे, करण सकटे, विजय तडाखे, आदित्य पाटोळे, अनिकेत माने, राज तडाखे, सिध्दू मधाळे, रोहन आवळे आदी उपस्थित होते.

वसंतराव देशमुख स्कूल
सानेगुरुजी वसाहत : येथील श्री. वसंतराव जयवंतराव देशमुख सेकंडरी इंग्लिश स्कूलमध्ये प्रमोद गंधवाले यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. या वेळी मुख्याध्यापक सुरेश कांबळे उपस्थित होते. गायत्री कोकाटे, प्रणोम सुतार, अथर्व पोवार, प्रमोद गंधवाले यांनी मनोगत व्यक्त केले. रेवा बिंदी व उत्कर्षा तांदळे यांनी सुत्रसंचलन केले. या वेळी मुख्याध्यापक सुरेश कांबळे, सावित्री कांबळे, स्वाती मुंगळे उपस्थित होते.

शुभंकरोती इंग्लिश स्कूल
सानेगुरुजी वसाहत : शुभंकरोती इंग्लिश प्ले स्कूल व कर्मवीर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मनीषा पाटील यांच्या हस्ते प्रतिमचे पूजन झाले. या वेळी मुख्याध्यापिका जयश्री गुरव, अमृता ताटे यांनी विचार मांडले. वक्तृत्व व निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. शर्विल पाटील, प्रज्वल भोरपे, गौरवी कचरे, सिद्धी कुंभार, प्रतीक जाधव, अरिन हेरवाडे, सानिका शेळके, अनुष्का धनवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. भूमी शेळके हिने सूत्रसंचालन केले. या वेळी डॉ. सायली कचरे, पुनम मुसळे, मीरा चौगले उपस्थित होते. संयोजन जयश्री गुरव, अमृता ताटे, रसिका पोतदार, अश्विनी पाटील, सेजल तराळ, सुरेखा काशीद, विशाल भोरे, प्रियांका धनवडे, रोहन शिंदे, प्रियांका कोरवी, श्वेता प्रभावळकर, सपना खोराटे, रुपाली डोने, मनीषा पाटील, सीमा किल्लेदार, संदीप पाटील, लता नायर आदिंनी केले.

समर्थ विद्यालय, उचगाव
गांधीनगर : उचगाव (ता. करवीर) येथील समर्थ विद्यालयात प्रसाद जमदग्नी प्रमुख पाहुणे होते. श्रीजीवन तोंदले यांनी मार्गदर्शक केले. अश्विनी पाटील यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी बडबडगीते, कथा वाचन, काव्य वाचन, कोडी, नाटक, नृत्य अश्या विविध कालागुणांचे सादरीकरण केले. मनोज शेडगे यांनी लिहिलेले शिवपुत्र संभाजी हे पुस्तक मान्यवरांना भेट स्वरुपात देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन ७ वीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी केले. त्यांना वर्ग शिक्षिका मुग्धा गोरे-लिंगनूरकर यांनी मार्गदर्शन केले. यास्मीन काझी यांनी आभार मानले. या वेळी मुख्याध्यापिका स्वाती उपाध्ये, उपमुख्याध्यापक सचिन घाडीगावकर, मुख्याध्यापक परशराम माईनकर, शिक्षक उपस्थित होते.

ए. वाय. पाटील विद्यालय
धामोड : कोनोली तर्फे असंडोली (ता. राधानगरी) येथील ए. वाय. पाटील माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. मुख्याध्यापक व्ही. एस. तोरस्कर अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक के. के. जाधव यांनी केले. कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री. तोरस्कर यांच्या हस्ते झाले. या वेळी शुभम पाटील, स्वप्नील महाडिक यांनी मराठी भाषेचे महत्त्व मनोगतातून सांगितले. कार्यक्रमास एस. व्ही. चरापले, एम. एस. चांदणे, दशरथ कुपले उपस्थित होते. रोहित पाटील यांनी आभार मानले.

चौकट
मराठीला आईप्रमाणे
जपली पाहिजे; बबलू वडर
बोरपाडळे : अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीला आईप्रमाणे जपली पाहिजे, असे मत कवी बबलू वडर यांनी व्यक्त केले. ते बोरपाडळे (ता. पन्हाळा) येथील प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. बालकविता सादर करीत चिमुकल्याची मने जिंकली. बाबासाहेब खोत यांनी प्रास्ताविक केले. संजय नलवडे यांनी स्वागत केले. अनिल मोरे यांनी मराठी दिनाबद्दल मार्गदर्शन केले. या वेळी स्वाती लोहार, शशिकांत कोडोले, प्रभावती खरात, सारिका समुद्रे, अंकिता जंगम आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक बाबासाहेब सोरटे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com