संक्षिप्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त पट्टा
संक्षिप्त पट्टा

संक्षिप्त पट्टा

sakal_logo
By

03325
राज्य वीरशैव सभेचे सुनील गाताडे उपाध्यक्ष
कोल्हापूर ः वीरशैव लिंगायत समाजाची शिखर संघटना असलेल्या राज्य वीरशैव सभेच्या उपाध्यक्षपदी पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापूर वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या पुणे येथील कार्यालयात झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत ही निवड झाली. श्री. गाताडे यांनी कोल्हापूर वीरशैव समाजाच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रूद्रभूमी परिसर विकास, स्वच्छता मोहीम, विविध समाजोपयोगी कार्यक्रम राबवले. त्याची दखल घेऊन राज्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
.............
फक्त फोटो- 85654
............
85653
‘जरतकारू’ कादंबरीचे मुंबईत प्रकाशन
कोल्हापूर : डॉ. प्रिया दंडगे यांनी महाभारताच्या आदिपर्वावर लिहिलेली ‘जरतकारू’ ही इंग्रजी कादंबरी वाचकांना नक्कीच पसंत पडेल, अशी अपेक्षा प्रसिद्घ दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी व्यक्त केली. मुंबईत झालेल्या कादंबरीच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते.
कादंबरी काल्पनिक असली तरी सत्याशी प्रतारणा करता कामा नये. लेखिकेने या कादंबरीत महाभारतातील एका उपेक्षित विषयांला हात घातला असल्याच्या भावना श्री. गोवारीकर यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारतीय कामगार सेना सचिव कृष्णा हेगडे, अशोक गोवारीकर, माँ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जगदीश पुरोहित, निर्माते जितेंद्र पाटील, प्रतापसिंह मोहिते, जय पुरोहित आदी उपस्थित होते. चित्रकार विजय टिपुगडे यांनी रेखाटलेले रंकाळा हे चित्र मल्हार दंडगे यांनी गोवारीकर यांना भेट दिले.