गड-गांजा जप्त

गड-गांजा जप्त

कडगावजवळ एक किलो गांजा जप्त

शिप्पूरच्या एकास अटक : गडहिंग्लज पोलिसांची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. २७ : जखेवाडी ते कडगाव रोडवर पोलिसांनी सापळा रचून १ किलो ७६ ग्रॅम गांजा जप्त केला. याप्रकरणी अविनाश गजानन जाधव (२४, रा. शिप्पूर ता. गडहिंग्लज) यास पोलिसांनी अटक केली आहे. गांजा, मोटारसायकल, मोबाईल असा ५५ हजार ४४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. आज दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबतची माहिती अशी, गडहिंग्लजचे सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांना एक तरुण गांजा घेऊन शिप्पूरहून गडहिंग्लज शहरात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दिवसे हे पोलिस पथक, पंच सोबत घेऊन कडगावजवळच्या जखेवाडी फाट्यावर पोहचले. त्याठिकाणी कर्मचाऱ्यां‍ची दोन गटात विभागणी केली. दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास जखेवाडीकडून एक तरुण मोटारसायकलवरून (एमएच ०९, डीयू ३७९७) येत असल्याचे दिसले. आधीच मिळालेल्या माहितीनुसार या तरुणाचे वर्णन हुबेहूब असल्याने संशय आला. यामुळे दिवसे यांनी त्याला अडविले. त्याला नाव विचारले असता अविनाश जाधव (शिप्पूर) असे सांगितले. पोलिस असल्याचे त्याला सांगितल्यानंतर त्याने अंगझडती घेण्यास नकार दिला. तरीही पोलिसांनी त्याची झडती घेतली. त्याच्याकडील सॅकमधील एका प्लास्टिक पिशवीत हिरवट पाने, फुले, काड्या, बिया असलेला ओलसर पदार्थ आढळला. त्याचा वास घेऊन पाहताच हा अमली पदार्थ गांजा असल्याची खात्री झाली. त्यानंतर त्याला अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीच्या गांजासह मोटारसायकल, सॅक, मोबाईल पोलिसांनी जप्त केला. या अमली पदार्थाचा एक नमुना रासायनिक विश्‍लेषणासाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिस नाईक नामदेव कोळी यांनी फिर्याद दिली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे करीत आहेत. या कारवाईत पोलिस हवालदार शिंदे, श्री. पाटील, कॉन्स्टेबल दीपक किल्लेदार, मोरे सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com