जनस्वास्थ अभियान पुरस्कार वितरण

जनस्वास्थ अभियान पुरस्कार वितरण

85614
...
न्यू मॉडेल इंग्लिश
स्कूल ठरली आदर्श शाळा

जनस्वास्थ्य अभियानांतर्गत पुरस्कारांचे वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी जानेवारीत जिल्ह्यातील आठशे माध्यमिक शाळांमध्ये जनस्वास्थ्य अभियान राबवण्यात आले. त्यामध्ये सहभागी आदर्श शाळा व आदर्श शिक्षकांना आज पुरस्काराने गौरवण्यात आले. येथील न्यू मॉडेल इंग्लिश स्कूलचा आदर्श शाळा म्हणून गौरव झाला. या वेळी मिलिंद यादव यांचा विशेष सन्मान झाला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश साळुंके होते. या वेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे आणि शिक्षण विस्तार अधिकारी विजय ओतारी यांनी मार्गदर्शन केले. सुधीर हंजे यांनी स्वागत केले. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. बृहस्पती शिंदे यांनी आभार मानले. आर. वाय. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
...

अनुक्रमे पुरस्कार विजेते असेः
० आदर्श शाळा ः न्यू मॉडेल इंग्‍लिश स्कूल (कोल्हापूर), सौ. शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूल (कोल्हापूर), हिडदुग्‍गी हायस्कूल (गडहिंग्लज), श्री रवळनाथ हायस्कूल, देवर्डे (आजरा)
० उत्तेजनार्थ शाळा पुरस्कार ः राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल (कोल्हापूर), इंदिरा गांधी विद्यानिकेतन (कोल्हापूर), उषाराजे हायस्कूल (कोल्हापूर), परशराम पाटील माध्यमिक विद्यालय (मुदाळ), परिश्रम विद्यालय (दुंडगे, गडहिंग्लज).
० आदर्श शिक्षक ः दिनकर पाटील (श्री रवळनाथ विद्यालय, कुमरी (गडहिंग्लज), विलासराव अतिवाडकर (आनंदीबाई सरदेसाई हायस्कूल, कोल्हापूर), अरुंधती शुक्ल (वसंतराव चौगुले इंग्‍लिश मीडियम स्कूल, कोल्हापूर)
० पोस्टर स्पर्धा ः अनन्या चौहान (इंदिरा गांधी विद्यानिकेतन), स्वराज्य साठे (नानासाहेब गद्रे हायस्कूल), श्रेयांश शाह (नानासाहेब गद्रे हायस्कूल)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com