बुवा मठातील महाराजांची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुवा मठातील महाराजांची आत्महत्या
बुवा मठातील महाराजांची आत्महत्या

बुवा मठातील महाराजांची आत्महत्या

sakal_logo
By

85643
....

बुवाच्या मठातील महाराजांची आत्महत्या


कोल्हापूर, ता. २७ : शिवाजी पेठेतील बुवाच्या मठातील (गोरक्षनाथ मठ) प्रभारी प्रमुख महाराजांनी आज मठातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पिरयोगी त्रिलोकनाथजी गुरुपिर दीनानाथजी (वय ५६) असे त्यांचे नाव आहे. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याची नोंद झाली.
महाराज मूळचे बनारसचे असून बहुतांशी वर्षे ते बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथे राहत होते. गेली काही महिने ते या मठात राहण्यासाठी आले होते. छातीच्या दुखण्याने गेली काही दिवस त्रस्त होते. त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचा अंदाज स्थानिक भक्त आणि पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरा त्यांच्याच मठात त्यांचा दफनविधी करून तेथे समाधी चबुतरा उभारण्यात येणार असल्याचे भक्तांनी सांगितले. अंत्यविधीसाठी सांगली, कर्नाटकासह अन्य जिल्ह्यातील महाराज, भक्त उपस्थित होते.
पोलिसांकडून, भक्तांकडून मिळालेली माहिती अशी, शिवाजी पेठेतील आठ नंबर शाळेजवळ असलेल्या गोरक्षनाथ मठ अर्थात बुवांच्या मठात प्रभारी प्रमुख म्हणून पिरयोगी त्रिलोकनाथजी गुरुपिर दीनानाथजी यांची नियुक्ती केली होती. पिरयोगी त्रिलोकनाथजी हे दिवंगत मठप्रमुख गुरुपिर दीनानाथजी यांचे शिष्य होते. त्यांच्या निधनानंतर मठाचे प्रभारी प्रमुख म्हणून त्रिलोकनाथजी यांच्याकडे कार्यभार सोपविला होता. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून ते शिवाजी पेठेतील मठात राहत होते. गेल्या काही दिवसांपासून मठात ते एकटेच राहत होते. आज सकाळी आठच्या सुमारास एक भक्त त्यांच्या दर्शनासाठी गेला होता. तेंव्हा त्यांनी महाराजांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने शेजारील खोलीतून पाहिले असता छताच्या हुकाला त्यांनी दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती इतर भक्तांसह जुना राजवाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी मठात जाऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. नाथ संप्रदायातील प्रथेनुसार पिरयोगी त्रिलोकनाथ यांचा मृतदेह मठाच्या आ‌वारात दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.