घरफाळा सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफाळा सवलत
घरफाळा सवलत

घरफाळा सवलत

sakal_logo
By

‘घरफाळा दंड
५० टक्के सवलत
मुदत वाढवा’

कोल्हापूर ः घरफाळा दंडामधील ५० टक्के सवलतीची मुदत मार्चअखेर करावी. त्यातून नागरिकांना दिलासा मिळेल व महापालिकेचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने आज महापालिका प्रशासकांकडे केली.निवेदनात म्हटले आहे, घरफाळा पूर्ण भरणाऱ्याना दंड व्याजात ५० टक्के सवलत जाहीर केली होती. उद्या शेवटचा दिवस आहे. अनेक लोकांना मार्च महिन्यामुळे आर्थिक टंचाई जाणवते. लोकांची इच्छा असूनही आर्थिक ओढाताणीमुळे या योजनेचा लाभ घेता आलेला नाही. या सवलतींचा फायदा नागरिकांना घेण्यासाठी सवलतीची मुदत मार्चअखेरपर्यंत केल्यास लोक मोठ्या प्रमाणात घरफाळा भरण्यास तयार आहेत. त्यांना दिलासा मिळेल व महापालिकेचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तरी सवलतीची मुदत मार्चअखेर करावी. यावेळी शहरप्रमुख सुनील मोदी, उपजिल्हाप्रमुख अवधुत साळोखे, युवा सेना जिल्हा प्रमुख मंजित माने, उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत उपस्थित होते.