दिवसात दोन कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवसात दोन कोटी जमा
दिवसात दोन कोटी जमा

दिवसात दोन कोटी जमा

sakal_logo
By

दोन कोटी पंधरा लाख
दिवसात झाले जमा

५० टक्के सवलतीचा आज शेवटचा दिवस

कोल्हापूर, ता. २७ ः महापालिकेने राबवलेल्या घरफाळा दंडव्याज सवलत योजनेमध्ये आज एका दिवशी दोन कोटी पंधरा लाख जमा झाले. उद्या ५० टक्के सवलतीचा शेवटचा दिवस असून, नागरी सुविधा केंद्रे रात्री अकरापर्यंत सुरू राहणार आहेत.
घरफाळा विभागाने थकबाकीदारांना थकबाकीच्या दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरल्यास दंडव्याजात सवलत जाहीर केली. फेब्रुवारीमध्ये ५० टक्के व मार्चमध्ये ४० टक्के सवलत देण्यात येत आहे. फेब्रुवारीत ४८६३ करदात्यांनी ९ कोटी २९ लाख ५८ हजार थकीत रक्कम जमा केली आहे. आज एका दिवशी दोन कोटी पंधरा लाखाची रक्कम जमा झाली आहे. आजअखेर ९२७९२ करदात्यांकडून ६२ कोटी २८ लाख १२ हजार रक्कम जमा झाली आहे.
उद्या (ता.२८) दंडव्याजामध्ये ५० टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस आहे. त्यासाठी सर्व नागरी सुविधा केंद्रे रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवली आहेत. करदात्यांनी सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.