
जवाहरनगर हायस्कूल
85701
जवाहरनगर हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर ः श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या जवाहरनगर हायस्कूलमध्ये पारितोषिक वितरण झाले. यावेळी
प्रेरणा या मासिकाचे प्रकान संचालक दीपक पोवार यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष मानसिंगराव बोन्द्रे यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक वितरण झाले. शाळेचे माजी विध्यार्थी हेमंत पोळ प्रमुख पाहुणे होते. शाळेचे माजी विद्यार्थी प्रकाश नलवडे यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ आदर्श विध्यार्थी पुरस्कार प्रदान केला. संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक रुपेश खांडेकर, कर्मचारी विष्णू चौगले, विठ्ठल आंबले उपस्थित होते. साई हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री एस. पी. पाटील, माजी मुख्याध्यापक श्री. बी. एच. पाटील, माजी शिक्षक ए. एच. शिंदे, श्रीमती देसाई, माजी विद्यार्थी, पालक वर्ग उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक वाय. एस. पोवार यांनी केले. एस. ए. भास्कर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अहवाल वाचन जिमखाना प्रमुख एस. के. सोनाळकर यांनी केले. सूत्रसंचालन व्ही. व्ही. कांबळे व एम . एस. पाटील यांनी केले. एच. व्ही. तेलवेकर यांनी आभार मानले.