बाजार समिती निवडणूक

बाजार समिती निवडणूक

बाजार समित्यांच्या यादीचा कार्यक्रम जाहीर

आजपासून हरकती ः कोल्हापूरसह, गडहिंग्लज, जयसिंगपूर बाजार समितीचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः कोल्हापूरसह गडहिंग्लज व जयसिंगपूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून या यादीवर आजपासून हरकती मागवण्यात आल्या आहेत. ८ मार्च हा हरकती दाखल करण्याचा अखेरचा दिवस तर १७ मार्च रोजी हरकतीवरील निर्णय देण्यात येणार आहेत. २० मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ज्या प्राथमिक कृषी संस्था व ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया १ सप्टेंबर २०२२ नंतर पण ८ फेब्रुवारी २०२२३ पर्यंत पूर्ण झालेल्या अशा संस्था व ग्रामपंचायतींचे सदस्य मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. ही वाढीव नावे समाविष्ट करण्यासाठी १० फेब्रुवारी रोजी आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार बाजार समित्यांनी या नावांचा समावेश केला आहे.
कोल्हापूर बाजार समितीत निवडणूक झालेल्या २९५ ग्रामपंचायतीतील २८९९ सदस्य वाढले आहेत. गडहिंग्लज समितीत १२८ ग्रामपंचायतीच्या नव्या सदस्यांची तर जयसिंगपूर समितीत १७ ग्रामपंचायतीतील २२० नव्या सदस्यांची नांवे समाविष्ट करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील या तिन्हीही ग्रामपंचायतीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली आहे. पण कोरोनामुळे या निवडणुका लांबलेल्या होत्या. त्यानंतर राज्यात सत्ता बदल झाला आणि या समित्यांवरील अशासकीय मंडळही बरखास्त करण्यात आले होते. आता निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशाने मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या तिन्ही बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.
......................

दृष्‍टिक्षेपात सभासद
बाजार समितीचे नाव विकास सोसायटींची संख्या (कंसात मतदार) ग्रामपंचायतींची संख्या (कंसात मतदार)
कोल्हापूर ११७५ (१४,१३१) ६०३ (५,७३३)
गडहिंग्लज ४१० (४८९५) ३११ (२७२९)
जयसिंगपूर १५३ (१९१०) ५२ (६६८)
............................................................................................................................
अडते हमाल
कोल्हापूर १२१७ ८९४
गडहिंग्लज ६९७ १४७
जयसिंगपूर ३५६ ८७
..............................................................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com