विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सक्तीने भूसंपादन

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सक्तीने भूसंपादन

विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सक्तीने भूसंपादन
---
ऑनलाइन बैठकीत निर्णय; लवकरच होणार संपादन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ ः कोल्हापूर विमानतळाचे भूसंपादन आता कायदेशीर सक्तीने केले जाणार आहे. याची प्रक्रिया लवकरच सुरू करून आवश्यक असणारी उर्वरित जमीन संपादित केली जाईल. विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आला.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. या विस्तारीकरणाचा आढावा घेण्यासाठी आज ऑनलाइन बैठक घेण्यात आली. या वेळी मुंबईत प्रधान सचिव उपस्थित होते. या बैठकीत कामाचा आढावा घेण्यात आला. विस्तारीकरणासाठी जी जमीन संपादित केली जाणार आहे, त्या जमीन मालकांना प्रशासनाने शासनाचे धोरण, त्यांना मिळणारी रक्कम, विमानतळाच्या विस्तारीकरणाचा नागरिकांना होणारा लाभ याची माहिती देण्यात आली. त्यामुळे १० हेक्टर जमीन संपादित झाली. मात्र, अजूनही १६ हेक्टर जमीन संपादित करणे बाकी आहे. ही जमीन कायदेशीर सक्तीने संपादित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. विमानतळ विस्तारीकरणात धावपट्टी, कार्गो, पार्किंग, नवीन टर्मिनल उभारण्यात येणार आहे. या ऑनलाइन बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावार, करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com