अंबाबाई मुर्तीबाबत तज्ञ समिती नेमावी

अंबाबाई मुर्तीबाबत तज्ञ समिती नेमावी

अंबाबाई मूर्तीबाबत
तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी

‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २७ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाली असून मूर्तीबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, अशा मागणीचे निवेदन प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई- मेलच्या माध्यमातून दिले आहे. विधि व न्याय खात्याचे सचिव, पुरातत्त्व खात्याचे अधिकारी डॉ. एम. आर. सिंह, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष आणि जिल्हा पोलिसप्रमुखांनाही त्यांनी हे निवेदन पाठवले आहे.
मूर्तीची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. पुरातत्त्व विभागाचे तज्ज्ञ, मूर्ती अभ्यासक, शासनाचे तज्ज्ञ आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक यांची तज्ज्ञ समिती नेमून त्याबाबतचा योग्य निर्णय होणे आवश्यक आहे. देवीचा गाभारा लहान असून प्रवेश करण्यासाठी एकच दरवाजा आहे. गाभाऱ्यात एकही खिडकी नसून केवळ एक पंखा आहे. जास्त भाविक गाभाऱ्यात गेल्यास अधिक कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते आणि पंख्यामुळे अशुद्ध हवा गाभाऱ्यामध्ये फिरत राहते. त्याचाही मूर्तीवर परिणाम होतो. पुरातत्त्व खात्याने यापूर्वी २९ मे २०१६ रोजी सादर केलेल्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचेही श्री. देसाई यांनी या निवेदनात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com