कायमस्वरूपी क्लॉथ बॅंक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कायमस्वरूपी क्लॉथ बॅंक
कायमस्वरूपी क्लॉथ बॅंक

कायमस्वरूपी क्लॉथ बॅंक

sakal_logo
By

85745

गरजूंसाठी कायमस्वरूपी ‘क्लॉथ बॅंक’
राजारामपुरी तरूण मंडळ, रोटरी-रोटरॅक्टच्या उपक्रमाला प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः नवीन कपडे आणली पण मापाची नाहीत...कपडे चांगली आहेत पण आता बसत नाहीत...मग त्याचे काय करायचे, असा प्रश्न घरांघऱांत असतो. पण, ती कुणा गरजूंना द्यायची तर दिवाळीची प्रतीक्षा करावी लागते. मात्र, अशा सर्वांसाठीच राजारामपुरी तरूण मंडळ, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलने कायमस्वरूपी क्लॉथ बॅंक सुरू केली आणि त्याला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कोणतीही व्यक्ती त्यांच्या घरातील जुने किंवा नवीन कपडे येथे आणून देवू शकते. मात्र, कपडे सुस्थितीत व स्वच्छ धुवून इस्त्री केलेले असावेत. फाटलेले, किसलेले, खराब कपडे देवू नयेत, असा येथील पहिला नियम आहे. दुसरा नियम म्हणजे योग्य त्या गरजूंपर्यंतच हे कपडे आवश्यकतेनुसार दिले जातात. नवीन कपडे असतील तर बालकल्याण संकुल, वृध्दाश्रमांना प्राधान्य दिले जाते. मंडळातर्फे मोफत वाचनालय चालवले जाते. याच वाचनालयात ही क्लॉथ बॅंक सुरू आहे.

कपड्यांच्या दातृत्वाचा प्रवास...
जुनी पण चांगली कपडे गरजूंना देण्याचे दातृत्व कोल्हापूरकरांनी पहिल्यापासूनच जपले आहे. राजारामपुरीतील महालक्ष्मी ॲपरल्सच्या वतीने गेली अनेक वर्षे आनंदवनातील कुष्ठरूग्ण बांधवांसाठी हा उपक्रम राबवला जातो. वर्षातून एकदा कैक हजार कपडे व्यवस्थित पार्सल करून पाठवले जातात. अलिकडच्या काळात दिवाळीच्या निमित्ताने गरजूंना चांगली कपडे मिळावी, यासाठी माणुसकीची भिंत, आपुलकीची भिंत अशा संकल्पना पुढे आल्या आणि त्यालाही कोल्हापूरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. मात्र, कायमस्वरूपी अशी सुविधा नव्हती. ही गरज ओळखून डॉ. निरंजन शहा यांनी राजारामपुरी तरूण मंडळांच्या कार्यकर्त्यांना कायमस्वरूपी आपुलकीची ऊब क्लॉथ बॅंकेची संकल्पना सुचवली. त्याला ‘रोटरी-सेंट्रल''चे सहकार्य मिळाले आणि ही संकल्पना प्रत्यक्षात कार्यरत झाली.

कोट
गेल्या चार महिन्यात हजारो कपडे येथे संकलित झाले आणि ते योग्य त्याच गरजूंपर्यंत पोचवले गेले. ज्यांना या उपक्रमात सहभागी होत गरजूंना कपडे द्यायची असतील त्यांनी लकी बझारसमोरील क्लॉथ बॅंकेशी संपर्क साधावा.
- संभाजी जगताप