जलजीवनमुळे घराघरात शुद्ध पाणी; खासदार मंडलिक

जलजीवनमुळे घराघरात शुद्ध पाणी; खासदार मंडलिक

85798
नरेवाडी : जलजीवन पाणी योजना प्रारंभ कार्यक्रमात बोलताना संजय मंडलिक. शेजारी राजेश पाटील, रामाप्पा करिगार, अंकुश रणदिवे आदी.

‘जलजीवन’मुळे घराघरांत शुद्ध पाणी
---
खासदार मंडलिक; नरेवाडीत पाणी योजनेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १ : जलजीवन मिशन योजनेमुळे प्रत्येक घरात शुद्ध पाणी मिळणार आहे. खेड्यातील महिलांचा महत्त्वाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटेल, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. नरेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जलजीवन मिशन पाणी योजनेच्या कामाचा प्रारंभ करताना ते बोलत होते. आमदार राजेश पाटील अध्यक्षस्थानी होते.
मंडलिक म्हणाले, ‘‘नरेवाडी ते येणेचवंडी हा रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अशा मोठ्या योजनेतून पूर्ण करून पूर्व भागातील दळणवळण सुधारण्याला चालना दिली जाईल.’’ आमदार पाटील म्हणाले, ‘‘नरेवाडीकरांचा अभिमान उंचावणारे मंगाईदेवी मंदिर आहे. या मंदिराकडे जाणारा रस्ता ताबडतोब मंजूर केला जाईल.’’
सरपंच अंकुश रणदिवे, भास्कर पाटील, मधुकर येसणे, शिवाजी पाटील, डॉ. गंगाधर व्हसकोटी यांची भाषणे झाली. सुकन्या रणदिवे हिचा सत्कार आमदार पाटील यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास जयकुमार मुन्नोळी, दीपक पुजारी, उपअभियंता वैजनाथ कराड, गौरव कांबळे, किरण खटावकर, रामाप्पा करिगार, जयसिंग चव्हाण, मच्छिंद्रनाथ पाटील, सुभाष पाटील यांच्यासह ग्रामपंचायतींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, पूर्व भागातील सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com