गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरतील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

८५८००
मनवाड : बांधकाम कामगारांना उदय जोशी यांच्याहस्ते सुरक्षा किटचे वाटप झाले. ज्ञानप्रकाश रेडेकर, अरुण मिरजे, मारुती पाटील, अजित पाटील आदी उपस्थित होते.

मनवाडमध्ये कामगारांना साहित्य वाटप
गडहिंग्लज : मनवाड (ता. गडहिंग्लज) येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटपाचा कार्यक्रम झाला. धनसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष उदयराव जोशी यांच्या हस्ते वितरण झाले. शशिकांत पाटील यांनी स्वागत केले. सरपंच ज्ञानप्रकाश रेडेकर यांनी प्रास्ताविक केले. बांधकाम कामगार कल्याण योजनेची माहिती अजित पाटील यांनी दिली. यावेळी मारुती पाटील, अरुण मिरजे, किरण शिंदे, उपसरपंच वैभवी लोखंडे, पांडूरंग लोखंडे, शालिनी नावलगी, गिता रेडेकर, उमाजी रेडेकर, भरत अस्वले, किरण रेडेकर, महादेव रेडेकर, वंदना पाटील, गीता पाटील, मनिषा अस्वले, दिपा पाटील, विमल रेडेकर, सरिता नौकूडकर, शांता सुतार, निंगाप्पा रेडेकर आदी उपस्थित होते. शशिकांत चुंगडी यांनी आभार मानले.
----------------
किलबिलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन
गडहिंग्लज : येथील किलबिल विद्यामंदिर व इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात झाला. शाळेतील पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांनी विज्ञान उपकरणे, विविध चार्ट स्वत: तयार करुन त्याचे प्रदर्शन मांडले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. संस्थाध्यक्षा अंजली हत्ती, डॉ. सरस्वती हत्ती, मुख्याध्यापक आनंदा घोलराखे, शहजादी पटेल, विद्यार्थी, शिकि, कर्मचारी उपस्थित होते.
-----------------
प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
गडहिंग्लज : येथील नगरपरिषदेच्या दिनदयाळ अंत्योदय योजना विभागातर्फे नगरपालिका व सर्व्हर कॉम्प्युटरतर्फे कौशल्य प्रशिक्षण आयोजित केले आहे. कॉम्प्युटर हार्डवेअर व कापडी शिवणकाम या प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी १० मार्च अखेर प्रवेश घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे व सहायक प्रकल्पाधिकारी जयवंत वरपे यांनी केले आहे. या माध्यमातून अनुसुचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व अल्पसंख्याक प्रवर्गातील युवक व युवतींना शासनमान्य प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यांना रोजगार व व्यवसायाची संधीही उपलब्ध होईल. दहावी उत्तीर्ण, १८ वर्षे पूर्ण, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, जातीचा दाखला, दिव्यांग प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत अनिवार्य आहे. पालिकेतील दिनदयाळ अंत्योदय योजना विभाग व सर्व्हर कॉम्प्युटरशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
------------------
जागृतीमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : येथील जागृती प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुख्याध्यापक विजयकुमार चौगुले अध्यक्षस्थानी होते. जगदीश पाटील प्रमुख पाहुणे होते. राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक, तर संपत सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. तेजस्विनी कापसे, अनुप्रेक्षा कातकर, ऋचा कदम, श्रावणी कडाकणे, स्वरा गुंजकर, प्रांजली पाटील, निधी देसाई, भूमिका कुरळे यांनी मनोगत व्यक्त केले. गीता पाटील, अनिता पाटील, विजयकुमार चौगुले यांची भाषणे झाली. शिवाजी अनावरे, रवींद्र लोखंडे, आशपाक मकानदार, पुंडलिक रक्ताडे व शिक्षक उपस्थित होते. कल्पना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब खरात यांनी आभार मानले.
------------------
साधनामध्ये ३९२ परीक्षार्थींची बैठक व्यवस्था
गडहिंग्लज : येथील साधना हायस्कूलच्या केंद्रावर दहावीच्या ३९२ परीक्षार्थीची बैठक व्यवस्थेचे नियोजन केल्याची माहिती केंद्र संचालक आर. एन. पटेल यांनी दिली. याठिकाणी मराठी व सेमी माध्यमाच्या एफ ०९६३७० ते एफ ०९६७५९, इंग्रजी माध्यमासाठी एफ ०९६६२७ ते एफ ०९६७५४, उर्दु माध्यम एफ ०९६७५५ ते एफ ०९६७५७, आयबीटी मराठी माध्यमातील क्र. ४ साठी एफ ०९६७५८ ते एफ ०९६७५९ पर्यंतची बैठक व्यवस्था निश्‍चित केली आहे. २ ते २५ मार्च अखेर या परीक्षा होणार आहेत.
-------------------
‘महाराष्ट्र’मध्ये मराठी राजभाषा दिन
गडहिंग्लज : अत्याळ येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात झाला. एम. डी. अडसुळे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले. एम. ए. पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी कवितेचे महत्व विषद केले. काव्य वाचन व निबंध स्पर्धेत यश मिळविलेल्या स्वरा देवरकर, आदिती पाटील, दिपाली पाटील, आर्यन गोडसे, हर्षदा शिंदे, अंकूश शेलार, विपूल मळगेकर यांना पारितोषिके देण्यात आली. प्रतिक्षा पाटील, देविका मगदूम यांनी बालगीत म्हटले. वनिता माने, पी. आर. पवार, एन. ए. जाधव यांनी कविता सादर केल्या.
------------------
८५७९९
औरनाळ : कृष्णाई अकॅडमीतर्फे प्रकाश माळगी यांचा सत्कार झाला. या वेळी अनिल पाटील, प्रा. एस. एस. सावंत, संपत सावंत, सतीश रेडेकर, संकेत वाघ आदी उपस्थित होते.

कृष्णाई अकॅडमीतर्फे माळगीचा सत्कार
गडहिंग्लज : औरनाळच्या कृष्णाई भरतीपूर्व प्रशिक्षण सामाजिक, शैक्षणिक अकॅडमीचा प्रशिक्षणार्थी प्रकाश माळगी याची इंडीगो एअर लाईन्समध्ये निवड झाल्याबद्दल अकॅडमीचे संचालक अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. संपत सावंत अध्यक्षस्थानी होते. अनिल पाटील यांचे भाषण झाले. प्रा. एस. एस. सावंत यांनी अकॅडमीच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रकाश माळगी याने कृतज्ञता व्यक्त केली. सावंत यांचे भाषण झाले. सतीश रेडेकर यांनी स्वागत, तर संकेत वाघ यांनी सूत्रसंचालन केले. सचिन कांबळे यांनी आभार मानले. चंदू नाईक व पालक, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
----------------
‘सिंबायोसिस’मध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा
गडहिंग्लज : हरळी बुद्रुक येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. निवृत्त शिक्षक प्रभाकर पोतदार प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापक संभाजी कार्वेकर यांच्या हस्ते श्री. पोतदार यांचा निवृत्तीबद्दल सत्कार झाला. वहिदा मुल्ला, यश देसाई, श्रावणी आसवले यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक कार्वेकर यांनी प्रास्ताविक केले. रावसाहेब मुरगी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. कविता कागीनकर यांनी सूत्रसंचालन केले. संतोष आंबी यांनी आभार मानले. किरण पाटील, बळवंत गुरव, राजेंद्र शेलार, अतूल अहिरे, अशोक पाटील, अनुपमा देसाई, दिगंबर पाटील, दत्ता गोंधळी, यलाप्पा कोळी, इंद्रजित पाटील आदी उपस्थित होते.
----------------
महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर
गडहिंग्लज : येथील दि प्रियदर्शिनी महिला सहकारी बँक, ओंकार महाविद्यालयातील शिवकन्या सखी मंचतर्फे ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. शिबीरात अस्थिरोग तज्ञ अनिल काशिद यांचे विविध व्याधींसाठी मसाज कसा करावा, डॉ. श्‍वेता आजरी, डॉ. वृषाली पेडणेकर यांचे दंतचिकित्सा शिबीर आणि डॉ. अश्‍विनी आंबूलकर व डॉ. निकिता तोडकर यांचे आयुर्वेदिक शिबीर होणार आहे. महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्षा माधुरी गाडीवड्ड, उपाध्यक्ष श्रीमती स्नेहलता देशपांडे, व्यवस्थापक कल्पना आंबूलकर, प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण, समन्वयक डॉ. संजीवनी पाटील व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.