
ओंकारमध्ये वेबीनार
ओंकारमध्ये स्पर्धा परीक्षेवर वेबीनार
गडहिंग्लज : ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेवर आधारीत राज्यस्तरीय वेबीनार झाला. पुण्याच्या युनिक अकॅडमीचे राहूल वडर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ऋतुजा बांदीवडेकर यांच्याहस्ते उद्घाटन झाले. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. पदवी परीक्षेचा अभ्यास करताना युपीएससी व एमपीएससीची तयारी कशी करावी या विषयावर हा वेबीनार झाला. श्री. वडर यांनी केवळ स्वप्न पाहून प्रशासकीय अधिकारी होता येत नाही तर त्यासाठी जिद्द, चिकाटी, परिश्रम, वेळापत्रक व अभ्यासाचे नियोजन महत्वाचे असल्याचे सांगितले. समन्वयक डॉ. संजीवनी पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. शर्मिला घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सचिन पाटील यांनी आभार मानले. वेबीनारमध्ये विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.