शैक्षणिक पत्रके एकत्रितपणे

शैक्षणिक पत्रके एकत्रितपणे

प्रा. प्रशांत पाटील यांना पीएच.डी.
कोल्हापूर : श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रशांत बिभीषण पाटील यांना नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील शारीरिक शिक्षण विषयाची पीएच.डी. पदवी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते प्रदान केली. त्यांनी ‘जागतिक समस्या असणाऱ्या स्थुलता निवारण’ समस्येवर संशोधन पूर्ण केले. ‘शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संलग्नित महाविद्यालयातील स्थूल विद्यार्थ्यांचा व्यायामविषयी प्रेरणा, फायदे व अडथळ्यांचा विश्लेषणात्मक अभ्यास’ यावर त्यांनी प्रबंध सादर केला होता. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ. डी. डी. बच्चेवार यांचे मार्गदर्शन लाभले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, वडील बिभीषण पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
...
85826
मंगेश मंगेशकर यांची निवड
कोल्हापूर : ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्मेट पेन्शनर्स असोसिएशन पुणे शाखा कोल्हापूरची वार्षिक सर्वसाधारण सभा शिवाजी मंदिर येथे झाली. सभेत मंगेश मंगेशकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड केली. सभेसाठी पुण्याहून जनरल सचिव एच. एफ. चौधरी, सहायक जनरल सचिव संजय कुलकर्णी, पुणे येथील के. एस. कुलकर्णी, सुहास सोनाळकर, शिवाजी तोंदले, किरण देशपांडे, कार्यकारिणतील सर्व संचालक, जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते.
...
85827
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिर येथील कार्यक्रमात सहभागी झालेले उपस्थित मान्यवर.

‘कनवा’त मराठी राजभाषा दिन
कोल्हापूर : करवीर नगर वाचन मंदिर येथे मराठी राजभाषा दिनानिमित्त कविता रसग्रहण कार्यक्रम संस्थेच्या सभागृहात झाला. अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी, उपाध्यक्ष नंदकुमार मराठे, कोषाध्यक्ष उदय सांगवडेकर, दीपक गाडवे, कार्यवाह डॉ. आशुतोष देशपांडे, सहकार्यवाह अश्विनी वळिवडेकर, कार्याध्यक्ष अभिजीत भोसले, उपकार्याध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे, डॉ. संजीवनी तोफखाने, मनिषा वाडीकर, अनिल वेल्हाळ, नीलाम्बरी कुलकर्णी, श्याम कारंजकर, ग्रंथपाल मनिषा शेणई आदी उपस्थित होते. डॉ. जोशी यांनी दिपप्रज्वलन आणि कुसूमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. कुसूमाग्रज, इंदिरा संत, बहिणबाई चौधरी, बा. भ. बोरकर आदींच्या कविता रसग्रहणाचा कार्यक्रम सादर झाला. २१ कवींनी सहभाग नोंदवला. सर्वोत्कृष्ट रसग्रहणासाठी प्रज्ञा शेवडे, वैदेही जोशी, जयश्री दानवे यांना बक्षीस देऊन सन्मानित केले. सर्व सहभागी कवींना सहभागाचे प्रमाणपत्र दिले. सौ. शेणई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. देशपांडे यांनी स्वागत केले. वळिवडेकर यांनी आभार मानले.
...
फक्त फोटो : 85837
कोल्हापूर : वाशी स्कूल येथे २००७-०८ मधील सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन झाले. संमेलनात गुरुजनांना आमंत्रण दिले होते. स्नेहमेळाव्याचा आनंद द्विगुणीत केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरुवात झाली. शाळेचे संस्थापक गोविंदराव कलिकते यांच्या प्रतिमेचे पूजन केले. नितेश सावंत, अजिंक्य पाटील, अमित बुडके, शिवाजी कांबळे, जयश्री कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमांत खेळ, एकमेकांबरोबर गप्पा, फोटोसेशन झाले.
...
फक्त फोटो : 85860
कोल्हापूर : इंडियन डेंटल असोसिएशनतर्फे मुंबई येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कोल्हापूर शाखेचे सभासद डॉ. राहुल पोवार यांना उत्कृष्ट राज्य निरंतर दंतवैद्य शिक्षण समन्वयक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. शाखेचे अध्यक्ष डॉ. पुनीत गिरीधर, राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक ढोबळे उपस्थित होते. डॉ. पोवार यांना महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. नितीन बर्वे, महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. विकास पाटील यांचे सहकार्य लाभले.
...

‘आम्ही भारतीय लोक...’तर्फे शुक्रवारी आंदोलन
कोल्हापूर : सुवर्णभूमी लॉन, शिरोली नाका येथे २६ फेब्रुवारी ते पाच मार्च दरम्यान अवैद्यानिक दावे करणाऱ्या कार्यक्रमाचे आणि यज्ञाचे आयोजन काही लोकांकडून केले आहे. या यज्ञाचा आणि अवैद्यानिक दावे करणाऱ्या कार्यक्रमाचा ‘आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या वतीने’ विरोध करत या यज्ञावर तीन मार्च रोजी धडक मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत केला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला बाबुराव कदम, अतुल दिघे, व्यंकाप्पा भोसले, सुभाष जाधव, वसंतराव पाटील, कुमार जाधव, स्मिता कांबळे, राजवैभव शोभा रामचंद्र, प्रतिज्ञा आदी उपस्थित होते. मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, जनता दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, जिजाऊ ब्रिगेड लाल निशाण पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्र सेवा दल, संभाजी ब्रिगेड, शिवराज्य मंच, मावळा कोल्हापूर यांनी आंदोलनात सहभागी होणार असे जाहीर केले.
...
जुनी पेन्शन योजनेसंदर्भात
१४ मार्चपासूनचा बेमुदत संप
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी १४ मार्चपासूनचा नियोजित बेमुदत संप करण्याबाबत जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांतर्फे निवेदन दिले. यासाठी राज्य शासकीय/निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, अन्य इतर सर्व कर्मचाऱ्यांतर्फे मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिलेली आहे, अशी माहिती विनायक कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
पत्रकातील माहितीनुसार, नवीन पेन्शन योजना रद्द होऊन जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, ही मागणी असेल तरच जलसंपदा विभागातील कर्मचारी संपामध्ये सहभागी होणार आहेत; कारण नवीन पेन्शन योजनांमधील कर्मचाऱ्यांसाठी सद्य:स्थितीत जुनी पेन्शन योजना ही मागणी जिव्हाळ्याची आहे. अन्य मागण्यांही सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. तथापी, आजपर्यंत शासनाने प्रत्येक वेळेस संघटनेच्या मागण्यांपैकी अगदी थोड्याच मागण्या मान्य करुन संप मोडीत काढला. त्यामुळे संघटनेचा प्रस्तावित संपही असाच मोडीत काढला जाण्याची शक्यता आहे. संप जुनी पेन्शन योजना या मागणीसाठी करावा, याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांना जिल्ह्यातील जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांच्या सह्याचे निवेदन दिले. विक्रम रजपूत, श्री. कांबळे, सागर देशपांडे, अनिल माने, रणजीत कांबळे आदी उपस्थित होते.
...
राजेंद्र वराळे अध्यक्षपदी
कोल्हापूर : जिल्हा दळप कांडप गिरणी मालक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राजेंद्र वराळे
(अध्यक्ष), रमेश पुरेकर (उपाध्यक्ष), नंदकुमार प्रभावळे (सचिव), रमिजखान मुजावर (खजानीस) यांनी निवड झाली; तर संचालक म्हणून मकरंद घुगरे, दत्तात्रय वाली, विजय कलकुटकी, शशिकांत एैनापुरे, आनंदी पाटील, स्वीकृत संचालक म्हणून शिवाजी येरूडकर, संपतराव सरनोबत, सदाशिव खडके, महेंद्र वरवंटे यांची निवड करण्यात आली. तसेच पुणे येथे झालेल्या विद्युत नियामक आयोगासमोर प्रस्तावित वीज दर वाढीविरोधात झालेल्या सुनावणीत संघाचे ज्येष्ठ संचालक श्री. घुगरे, अध्यक्ष श्री. वराळे यांनी समक्ष उपस्थित राहून आयोगासमोर संघाचे वीजदर वाढी विरोधात दराची विशेष श्रेणी लागू करावी. घरघंटीच्या विरोधात तक्रार, मुलभूत सुविधा, अन्न-वस्त्र, निवारा यामध्ये प्राथमिक गरज अन्न सत्रात गिरणी व्यावसाईकांचा समावेश करावा, अशी मागणीही केली.
----
अँकर

85849
कोल्हापूर : नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्समधील कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवर.

तत्वज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग : डॉ. मगदूम
कोल्हापूर : ‘‘विश्वामध्ये सातत्याने ज्या घडामोडी घडतात, यासंदर्भात काय? कसे? का? सारख्या प्रश्नांची उत्तरे अनादी काळापासून मानव शोधत आला आहे. ते केवळ जिज्ञासूवृतीमुळे. स्वतःच्या बौद्धीक कुवतीनुसार प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला . त्यातून जी उत्तरे मिळाली, त्यामुळेच तत्वज्ञानाचा उगम आणि विकास झाला. त्यामुळे तत्वज्ञान हे मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे,’’ असे मत डॉ. विश्वनाथ मगदूम यांनी व्यक्त केले.
नाईट कॉलेज ऑफ आर्टस अँड कॉमर्समधील समाजशास्त्र विभागातर्फे ‘संशोधनातील तत्वज्ञानात्मक दृष्टीकोन’ यावर कार्यशाळा झाली. डॉ. मगदूम म्हणाले, ‘‘मानवी जीवन समृद्ध करायचे असेल तर तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही. संशोधनातील वस्तुनिष्ठता आणि तार्कीक दृष्टिकोन विद्यार्थ्याना समजावून सांगितला पाहिजे.’’ डॉ. विजय मुसाई म्हणाले, ‘एखाद्या समस्येच्या कार्यकारण संबंधाचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय.’
‘संशोधन आणि तत्वज्ञान’ यावर डॉ. प्रभाकर निसर्गगंध यांनी चार्वाक दर्शन, भगवान महावीर, तथागत गौतमबुद्ध आणि गुरूनानक आदीचे तत्वज्ञान ही भारतीय समाजात रुजलेले तत्वज्ञान होते. जगातील तत्वज्ञानापेक्षा भारतीय तत्वज्ञानाचा दृष्टिकोन वेगळा असल्याचे मत मांडले. लीड निमंत्रक प्रा. ए. ए. कांबळे उपस्थित होते. समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. महेंद्रकुमार जाधव यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. एस. फराकटे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. ए. ए. गावडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com