
धनंजय विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
chd281.jpg
85829
नागनवाडी ः गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना निवृत्त प्राचार्य जे. बी. पाटील. शेजारी प्राचार्य सुरेश हरेर, अजित पाटील, बाळासाहेब बांदिवडेकर आदी.
------------------------------------
धनंजय विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ ः नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले. संस्थेचे सचिव जे. बी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. प्राचार्य सुरेश हरेर अध्यक्षस्थानी होते. अभियंता अजित पाटील प्रमुख पाहुणे होते.
शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम आलेले अय्यान शेख, आकांक्षा गावडे यांच्यासह एनएमएमएस परीक्षेतील ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार केला. जे. बी. पाटील, अजित पाटील, प्रकाश पाटील, अनंत धोत्रे, दत्तात्रय वरगावकर यांनी मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. शैलेश धुडूम, स्वरा शिरगावकर, अनंत कांबळे, संतोष गावडे, मोहन कुंदेकर, संजय रेडेकर, अनंत शिंदे, अनिल चांदेकर, प्रांजली चांदेकर, एस. आर. सप्ताळे, एस. पी. पाटील, आय. डी. मुल्ला, डी. डी. बेळगावकर, डी. व्ही. पाटील, एस. जे. पाटील, डी. डी. पाटील, सागर बांदिवडेकर, पी. पी. कांबळे उपस्थित होते. दरम्यान, या शाळेचे वेदांत शिंदे, प्रणव पाटील, चिंतामणी पाटील, अय्यान शेख यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले. मराठी भाषा पंधरवडा अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत कविता लेखनमध्ये जिज्ञा बामणे, मयुरेश चांदेकर यांनी पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. अभिवाचनमध्ये स्वरा शिरगावकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. कथाकथनमध्ये जिज्ञा बामणे व तृप्ती चांदेकर यांनी पहिला व दुसरा क्रमांक मिळवला. निबंधलेखनमध्ये अथर्व गावडे याने द्वितीय क्रमांक पटकावला.