प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत; आमदार राजेश पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत; आमदार राजेश पाटील
प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत; आमदार राजेश पाटील

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवायला हवेत; आमदार राजेश पाटील

sakal_logo
By

85831
तुर्केवाडी : प्राथमिक शिक्षक संघाच्या चंदगड शाखेच्या अधिवेशनात बोलताना आमदार राजेश पाटील. शेजारी माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, संभाजी पाटील, रमेश हुद्दार.

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न
प्राधान्याने सोडवायला हवेत
आमदार राजेश पाटील; चंदगड शिक्षक संघाचे तुर्केवाडीत अधिवेशन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २८ : राष्ट्राची पुढची पिढी घडवण्याचे काम प्राथमिक शिक्षक करीत असतात. त्यांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष करुन चालणार नाही. ते प्राधान्याने सोडवावे लागतील, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या (वरुटे गट) त्रैवार्षिक अधिवेशनात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. माजी राज्यमंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘इंग्रजी शिक्षणाच्या अट्टाहासामुळे जिल्हा परीषदेच्या शाळा ओस पडत आहेत. त्या टिकल्या नाहीत तर भविष्यात शिक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पालक, शिक्षकांनी वेळीच सजग व्हायला हवे. अशा शाळा सुसज्ज करण्याबरोबरच शिक्षकांचा एकही प्रश्न प्रलंबित राहणार नाही याची दक्षता शासनाने घ्यायला हवी.’’ भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, राजाराम वरुटे, संभाजी बापट, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बी. एस. पाटील, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता खांडेकर, जिल्हा सरचिटणीस डी. पी. पाटील, स्मीता डिग्रजे, केंद्र प्रमुख शामराव पाटील यांची भाषणे झाली. रमेश हुद्दार यांनी स्वागत केले. दस्तगीर उस्ताद यांनी प्रास्ताविकात संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. संघटनेची नूतन तालुका कार्यकारीणी जाहिर करण्यात आली. मावळते अध्यक्ष हुद्दार यांचा सत्कार करण्यात आला. शामराव पाटील यांनी पत्नी सुजाता यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव झाला. महादेव वांद्रे, वसंत जोशीलकर, एस.के. शिंदे, डी.बी. पाटील, बाळकृष्ण मुतकेकर, अनंतमोटर, बाबूराव कोरवी, अशोक नौकुडकर, तानाजी नाईक, परशराम नाईक, टी. जे. पाटील, श्रीकांत पाटील उपस्थित होते. संजय गावडे व आप्पाजी रेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. भरमू तारीहाळकर यांनी आभार मानले.