आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन

आजरा महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन

sakal_logo
By

आजरा महाविद्यालय
आजरा : भाषा ही संस्कृतीची वाहक असते. भाषा टिकली तर मराठी संस्कृती टिकेल, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ अशोक बाचुळकर यांनी केले. येथील आजरा महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ.ए.एन.सादळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. एम. बी. जाधव, डॉ. आप्पासो बुडके आणि विद्यार्थी उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्रा. बाळासाहेब कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अविनाश वर्धन यांनी आभार मानले.
देवर्डे येथील शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील सुतार होते. श्रेया कासले हिने स्वागत व प्रास्ताविक केले. कार्तिक कांबळे हिने सूत्रसंचालन केले. आयुष व कार्तिक नीळकंठ या विद्यार्थ्यांनी आभार मानले. वेदान्त बुरुड, रुद्र मिसाळे, संयोगिता सुतार व महादेव तेजम यांनी मनोगते व्यक्त केली. सरोजिनी कुंभार व रेश्मा बोलके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.