आजरा ः बिबट्याची दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः बिबट्याची दहशत
आजरा ः बिबट्याची दहशत

आजरा ः बिबट्याची दहशत

sakal_logo
By

पेरणोली परिसरात बिबट्याची दहशत
दोन कुत्र्यांचा पाडला फडशा ः भीतीचे वातावरण


आजरा, ता. २८ ः पेरणोलीपैकी नावलकरवाडी (ता. आजरा) परिसरात बिबट्याने दहशत माजवली आहे. गेले चार दिवस तो या परिसरात वावरत आहे. त्याने दोन कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
चार दिवसांपूर्वी मध्यरात्री बिबट्याने महादेव नावकर यांच्या कुत्र्याच्या पिल्लावर हल्ला केला. त्याच्या ओरडण्याने अरविंद नावलकर यांच्या घरासमोर राखण करत असलेले कुत्रे जागे झाले. ते बिबट्यावर चालून गेले. त्यालाही बिबट्याने पळवले. बांबूच्या वनात बिबट्याने त्याचा फडशा पाडला. या घटनेनंतर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी दयानंद सासूलकर यांचे कुत्रेही पळवले. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या या परिसरात वावरत असून, रात्रीच्या वेळी तो नावकरवाडीनजीक येत असतो. तो आला की रात्री कुत्र्यांच्या भुंकण्याच्या आवाज मोठ्याने येत असल्याचे ग्रामस्थ संताजी सोले यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी राखणीला जाताना काळजी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने केले आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पायाचे ठसे मिळवण्याचा प्रयत्न केला.
....

* बांबू व्यापाऱ्याला बिबट्याचे दर्शन

येथील एका शेतकऱ्याचा मेसकाठी (बांबूचा) अड्डा बांबू व्यापारी नामदेव कुकडे यांनी घेतला आहे. कुकडे हे नावकरवाडीकडे जात असताना वाटेत त्यांना बिबट्या जंगलाच्या दिशेने पळताना दिसला. याबाबतची कल्पना त्यांनी बांबू कामगारांना दिली व काम करताना दक्षता बाळगण्याची सूचना केली.

...

* आधी वाघ, नंतर बिबट्या

पेरणोलीच्या जंगलात वाघ आला आहे. त्याचा वावर महागोंड, अरळगुंडी, चिमणे परिसरात आहे. त्याने आठवड्यापूर्वी हरपवडे धनगरवाड्यावर म्हैस ठार केली आहे. त्यानंतर या परिसरात बिबट्याचेही आगमन झाले आहे.