
आजरा ः विद्यार्थांना शुभेच्छा कार्यक्रम
व्यंकटराव व भादवण हायस्कूलमध्ये
दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
आजरा, ता. २८ ः येथील व्यंकटराव हायस्कूल व भादवण हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शुभेच्छा कार्यक्रम झाला. व्यंकटरावमध्ये आजरा महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिपी अध्यक्षस्थानी होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व माजी विद्यार्थी प्रियांका सावंत यांनी अनुभवकथन केले. संचिता चौगुले,तृप्ती मिरजे, स्वालेहा नाईकवाडे, आदित्य देसाई, सिध्देश बिल्ले, संचिता नाईक,आदित्य पाटील,मैथिली जोशिलकर यांनी मनोगत व्यक्त केले. संचालक सुनील देसाई, एस. एस. गिलबिले, पी. एस. गुरव, एस. के. कुंभार यांनी मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार यांनी स्वागत तर प्राचार्य आर. जी. कुंभार यांनी प्रास्तविक केले. जनता सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल अध्यक्ष श्री. शिंपी, शोभा कुंभार, आदित्यराज पाटील, सोहम पाटील यांचाही सत्कार झाला. विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू दिली. उपाध्यक्ष आण्णासो पाटील, एस. पी. कांबळे, एस. डी. चव्हाण, के. ल. पाटील, पांडुरंग जाधव, सुनील पाटील, सचिन शिंपी, अभिषेक शिंपी उपस्थित होते. व्ही. ए. वडवळेकर यांनी सूत्रसंचालन तर बी. पी. कांबळे यांनी आभार मानले.
* भादवण हायस्कूलमध्ये सरपंच माधुरी गाडे, उपसरपंच संजय पाटील, सदस्य अर्जुन कुंभार उपस्थित होते. मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी प्रास्ताविक केले. सरपंच गाडे यांनी मार्गदर्शन केले. एस. वाय. भोये यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. श्रेयस खोराटे, ऋणाली पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. दहावीतील विद्यार्थी सुमित माने, शुभम गोईलकर, आदित्य पाटील, कोमल देसाई, वैजयंता निर्मळे, अमृता खुळे यांनी मनोगत व्यक्त केली.