वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार
वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार

वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार

sakal_logo
By

85918
इचलकरंजी : सर्वपक्षीय समन्वय समितीने वीज दरवाढ प्रस्तावाची स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयासमोर होळी केली.
--------------
वीजदरवाढ प्रस्तावाविरोधात एल्गार
प्रस्तावाची होळी; इचलकरंजीत सर्व पक्षीय समन्वय समितीतर्फे मोर्चा
इचलकरंजी, ता. २८ ः महावितरण कंपनीने ३७ टक्क्यांहून अधिक वीज दरवाढीचा प्रस्ताव आयोगाकडे दिला आहे. ही अन्यायी दरवाढ रद्द करावी. तसेच, वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत समपातळीवर आणावेत या मागणीसाठी आज सर्वपक्षीय समन्वय समितीतर्फे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयासमोर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी केली.
विद्युत नियामक आयोगाकडे महावितरणने वीज ग्राहकांवर ३७ टक्क्यांहून अधिक दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. दरवाढीला सर्व स्तरातून विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ग्राहक संघटना, सर्वपक्षीय समन्वय समितीने दरवाढीविरोधात विविध आंदोलने सुरू केली आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून सर्वपक्षीय समन्वय समितीने आज मोर्चा काढला. त्याची सुरुवात महात्मा गांधी पुतळा येथून झाली. घोषणा देत मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. येथे तहसीलदार शरद पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
त्यानंतर मोर्चा स्टेशन रोडवरील महावितरण कार्यालयावर धडकला. वीज दरवाढीचे गंभीर परिणाम विशद करून समन्वय समितीचे निमंत्रक प्रताप होगाडे यांनी वीज दरवाढ रद्द करून अन्य राज्यांच्या तुलनेत समपातळीवर आणण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंता प्रशांत राठी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर वीज दरवाढ प्रस्तावाची होळी करीत तीव्र असंतोष व्यक्त केला. आंदोलनात मदन कारंडे, संजय कांबळे, पुंडलिक जाधव, दत्ता माने, महादेव गौड, अनिल स्वामी, राहुल खंजीरे, चंद्रकांत पाटील, राजगोंडा पाटील, सतीश कोष्टी, विनय महाजन, दीपक राशीनकर, दिनकर अनुसे, विकास चौगुले, विश्‍वनाथ मेटे, प्रकाश गौड, उदयसिंग पाटील, धनाजी मोरे, संग्राम स्वामी, पदमाकर तेलसिंगे, सदा मलाबादे, जाविद मोमीन यांच्यासह विविध ४० पक्ष, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वीज ग्राहक सहभागी झाले होते.
---------
शेतकऱ्‍यांचा वीज वापर कमी असला तरी महावितरण त्यांच्या नावावर तब्बल ३० हजार कोटींचा घोळ दाखवते. त्यामुळे महावितरणच्या आकडेवारीवर कोणाचा विश्‍वासच बसत नाही. वीज खरेदीत भ्रष्टाचार. त्या भ्रष्टाचारात राज्यकर्तेही सहभागी असल्यामुळे या भ्रष्टाचाराला पायबंद घालणे गरजेचे आहे.
-राजू शेट्टी, माजी खासदार