डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून ‘राजगड-तोरणा’ सर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून ‘राजगड-तोरणा’ सर
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून ‘राजगड-तोरणा’ सर

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याकडून ‘राजगड-तोरणा’ सर

sakal_logo
By

85924
कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी राजगड-तोरणागड यशस्वीरित्या सर केला. सृष्टी ॲडव्हेन्चर क्लब आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या ट्रेकचे आयोजन केले.

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या
विद्यार्थ्यांकडून ‘राजगड-तोरणा’ सर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राजगड-तोरणागड यशस्वीरित्या सर केला. सृष्टी ॲडव्हेन्चर क्लब आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने या ट्रेकचे आयोजन केले.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राजगड-तोरणा ट्रेकचे आयोजन केले. त्यामध्ये ३७ विद्यार्थिनी, ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत एनएसएस प्रोग्राम ऑफिसर आणि ॲडव्हेन्चर क्लब समन्वयक प्रा. योगेश चौगुले, सुदर्शन साळोखे, विनायक लांडगे होते. हा ट्रेक यशस्वी करण्यासाठी ओमकार कोतमिरे, सुमित कांबळे, वैभव नागणे, ऋतुजा जगताप, प्रज्ञा महाडिक, पूनम पाटील, दिव्या फगारे या विद्यार्थी समन्वकांनी मेहनत घेतली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्‍वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे, डीन स्टुडंट अफेअर डॉ राजेंद्र रायकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
---------------
चौकट
२२ किमीचा ट्रेक पूर्ण
राजगड, तोरणा या किल्ल्यांवर जाण्यासाठी पाली तळावरून विद्यार्थ्यांनी कूच केले. सुमारे २२ किलोमीटरचा हा ट्रेक त्यांनी उत्साहात पूर्ण केला. अमित कोष्टी, आदित्य देसाई, हृषीकेश नेजे, प्रज्ञेश निगरे यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी झाला.