शिवराजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
शिवराजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

शिवराजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

sakal_logo
By

शिवराजमध्ये राष्ट्रीय
विज्ञान दिन साजरा
गडहिंग्लज, ता. ३ : येथील शिवराज महाविद्यालयात फिजिक्स विभाग व विज्ञान मंडळाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा झाला. डॉ. एम. पी. पाटील यांच्याहस्ते डॉ. सी. व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. सायन्सच्या विद्यार्थ्यांनी रिसेंट ट्रेंडस इन सायन्स या विषयावर तयार केलेल्या पोस्टर प्रेझेन्टेशनचे उद्‌घाटन प्रा. बिनादेवी कुराडे यांच्याहस्ते झाले. प्राचार्य डॉ. एस. एम. कदम अध्यक्षस्थानी होते. डॉ. एम. पी. पाटील यांनी विज्ञानाची आज काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्यावतीने झालेलया ऑनलाईन क्वीझ काँन्टेस्ट स्पर्धेतील विजेत्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विज्ञान मंडळाचे समन्वयक प्रा. जे. व्ही. सरतापे, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर आदाटे, प्रा. ए. बी. कोकणे, प्रा. तेजस्विनी शिंदे, प्रा. रेवती राजाराम, डॉ. विद्या देशमुख, प्रा. संकेत पाटील, प्रा. प्रवीण सरनोबत, प्रा. टी. ए. काझी यांच्यासह सर्व प्राध्यापक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ. विजय सावंत यांनी स्वागत केले. प्रा. गौरव पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा प्रवीण गंदूगडे यांनी आभार मानले.