डीकेटीईच्या २८ विद्यार्थ्यांची डीमार्टमध्ये निवड

डीकेटीईच्या २८ विद्यार्थ्यांची डीमार्टमध्ये निवड

ich2813.jpg
85927
इचलकरंजी : डीकेटीईच्या एमबीए विभागातील २८ विद्यार्थ्यांची डी-मार्टमध्ये निवड झाली.
--------------
डीकेटीईच्या २८ विद्यार्थ्यांची डीमार्टमध्ये निवड
इचलकरंजी, ता. २८ ः येथील डीकेटीईच्या एमबीए विभागातर्फे डीमार्ट कंपनीतर्फे पूल कॅम्पस आयोजित केला होता. कंपनीच्या प्लेसमेंटसाठी पाच महाविद्यालयांतील सुमारे १७० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. यामध्ये डीकेटीईच्या एमबीए विभागाच्या २८ विद्यार्थ्यांची साडेतीन लाखांच्या पॅकेजवर निवड केली. विद्यार्थ्यांची डिपार्टमेंटल मॅनेजर या पोस्टसाठी निवड झाली आहे.
डी-मार्ट ही रिटेल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून, तिचे देशभरात ३३० डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत. या कपंनीतर्फे उत्तम पाटील, असिस्टंट व्हाईस प्रेसिंडट, ऑपरेशन डिमार्ट पुणे व बाला शेलार, जनरल मॅनेजर एच आर यांनी दोन फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली. निवड झाल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना ऑफर लेटरही प्रदान केले.
विद्यार्थ्यांना निवडीबद्दल संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, सर्व विश्‍वस्त यांनी शुभेच्छा दिल्या. संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख प्रा. पी. एस. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर ए. एस. गणपते यांनी विशेष परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com