अंगणवाडी सेविका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडी सेविका
अंगणवाडी सेविका

अंगणवाडी सेविका

sakal_logo
By

85929
कोल्हापूर : अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनस्थळावर बोलताना आमदार ऋतुराज पाटील.

ऋतुराज पाटील यांनी घेतली
अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भेट
कोल्हापूर, ता. २८ : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किमान वेतन तसेच अन्य मागण्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस प्रयत्न करणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व लोकप्रतिनिधी या लढ्यात तुमच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात या प्रश्नाबाबत आवाज उठवून शासनाचे लक्ष वेधले आहे, अशी माहिती आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. मुंबई येथील आझाद मैदानात अंगणवाडी कर्मचारी महासंघातर्फे सुरु असलेल्या आंदोलनस्थळी भेट देवून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधन वाढ, पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी यासोबतच पोषण आहार दरात वाढ, पोषण आहार ट्रॅकिंग ॲप मराठीत असावे याबाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’’ या वेळी अंगणवाडी महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे, कोल्हापूर जिल्हा सचिव सुवर्णा तळेकर, अंगणवाडी कृती समिती सदस्य एम. ए. पाटील, शुभा रामिन, दिलीप उटाणे, जीवन सुरुडे, संगीता पोवार उपस्थित होते.