पत्रके एज्युकेशन

पत्रके एज्युकेशन

श्रीदत्ताबाळ हायस्कूलमध्ये प्रदर्शन
कोल्हापूर : श्रीदत्ताबाळ मिशन डिव्हाईन संचालित श्रीदत्ताबाळ हायस्कूल, श्रीदत्ताबाळ प्राथमिक विद्यामंदिरतर्फे विज्ञान दिन झाला. प्राथमिक शिक्षण समितीच्या पर्यवेक्षिका उषा सरदेसाई यांच्या हस्ते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिक उपकरण, शैक्षणिक साहित्याच्या प्रदर्शानाचे आयोजन केले. सौ. सरदेसाई यांनी विद्यार्थ्यांना आजच्या युगातील विज्ञानाचे महत्त्व तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. स्वाती जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक उपकरणाची प्रतिकृती तयार केली. संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी देसाई, सचिव नीलेश देसाई, विश्वस्त वेद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. व्यवस्थापक संदीप डोंगरे, मुख्याध्यापक सचिन डवंग, मुख्याध्यापिका रोहिणी शेवाळे, सौ. वर्धमाने आदी उपस्थित होते. विजयालक्ष्मी साबोजी यांनी सूत्रसंचालन केले. सविता पाटील यांनी आभार मानले.
...
एस. जे. पटेल यांचा सत्कार
कोल्हापूर : दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी संचालित शिरोली पुलाची येथील अँग्लो उर्दू हायस्कूलमधील ज्येष्ठ शिक्षक एस. जे. पटेल निवृत्त झाले. यानिमित्त त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे चेअरमन गणी आजरेकर अध्यक्षस्थानी होते. प्रशासक कादर मलबारी, रफीक शेख यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष आदिल फरास, ज्येष्ठ संचालक पापाभाई बागवान, हाजी जहाँगीर अत्तार, लियाकत मुजावर, आल्ताफ झांजी, फारूक पटवेगार, रफिक मुल्ला उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. एच. मोमीन यांनी प्रास्ताविक केले. शालेय समिती अध्यक्ष मलिक बागवान यांनी आभार मानले.
...
रोजगार मेळावा आज
कोल्हापूर : मेरे देश की धरतीतर्फे उद्या (ता. १) रोजगार मेळाव्याचे आयोजन न्यू शाहूपुरी येथील हॉटेल मराठा रिजन्सी येथे सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजता केले आहे. सुनील सेतवाल, सुदाम पवार, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. ॲड. पंडित राठोड, स्वप्ना कुलकर्णी, मनिष जाधव उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com