अंबाबाई मंदिर जागा संपादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिर जागा संपादन
अंबाबाई मंदिर जागा संपादन

अंबाबाई मंदिर जागा संपादन

sakal_logo
By

अंबाबाई मंदिर परिसरातील
जागा संपादनासाठी सक्ती नाही

जिल्हाधिकारी ः मालमत्ताधारकांसाठी दहा दिवस मुदत वाढवली
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील काही मालमत्ताधारकांनी देवस्थान समितीला जागा देण्यासाठी संमती दिली असून, त्यासाठी मंदिर परिसरातील मालमत्ताधारकांना विनंती पत्रे पाठवली आहेत. या पत्रात मालमत्ताधारकांना दोन मार्चपर्यंत मुदत दिली आहे. मात्र, काही मालमत्ताधारकांना अद्यापही पत्रे पोहचली नसल्याने आणखी दहा दिवसांची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
अंबाबाई मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत असून, भाविकांना विविध सुविधा देण्यासाठी मंदिराच्या परिसरातील जागा देवस्थान समितीच्या माध्यमातून घेतली जाणार आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी संमती दिली तरच मूल्यांकन होऊन पुढील प्रक्रिया होईल. मात्र, कुठल्याही मालमत्ताधारकाला सक्ती केलेली नाही. मंदिरावर अनेक व्यापाऱ्यांची उपजीविका आहे. त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापाऱ्यांसाठी मंदिरापासून काही अंतरावरच व्यापारी संकुल बांधण्याचीही समितीची तयारी असल्याचेही श्री. रेखावार यांनी सांगितले.