Wed, June 7, 2023

आजरा ः गवा मृत्यू बातमी
आजरा ः गवा मृत्यू बातमी
Published on : 28 February 2023, 4:39 am
किणेत गव्याचा विहिरीत पडून मृत्यू
आजरा ः किणे (ता. आजरा) येथे पडक्या विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. वनविभागाने जेसीबीच्या मदतीने त्याला बाहेर काढून अंत्यसंस्कार केले. वनरक्षक श्री. साबळे म्हणाले, ‘हा गवा तीन वर्षांची मादी आहे. ते कळपाने चालले होते. त्यांच्यात झालेल्या झुंजीमध्ये ही मादी तोल जाऊन विहिरीत पडली असावी. विहिरीत पाणी नसल्याने त्या मादीला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला. विहिरीच्या कडेला कळपाच्या पाऊलखुणा मिळाल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी किणे गावात एका शेततळ्यात पडून गव्याचा मृत्यू झाला होता.’