खोकला सर्दी ताप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोकला सर्दी ताप
खोकला सर्दी ताप

खोकला सर्दी ताप

sakal_logo
By

खोकला-सर्दी,
रुग्णालयात गर्दी
-
बदलत्या वातावरणामुळे वाढले रुग्ण


कोल्हापूर, ता. २८ ः दुपारी कडाक्याचे उन्ह, रात्रीचा उकाडा, पहाटेची थंडी अशा संमिश्र वातावरणामुळे घराघरांत सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, घसादुखी आदी लक्षणाचे रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे खासगी क्लिनिकबरोबर शासकीय रुग्णालयातही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. मात्र, हा संसर्ग नियमित असल्याने घाबरून न जाता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणे महत्त्वाचे असल्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. हिवाळा संपतानाच दरवर्षीपेक्षा यंदा उन्हाच्या झळा तीव्र झाल्या. शीतपेयाचे स्टॉल्स विविध ठिकाणी लागले आहेत. सुटीच्या निमित्ताने बाहेर फिरायला जाणे, दीर्घपल्ल्याचा प्रवास घडत आहे. मांसाहार, तिखट तेलकट जड पदार्थांचे भरपेट जेवण होत आहे. रात्री घरी आल्यावर उकाड्यामुळे फॅन, एसीचा वारा थेट अंगावर घेत झोपी जाणे, पहाटेच्या वेळी झोपेत असतानाच थंडी कानात, डोक्याला झोंबणे अशा कारणातून पोट बिघडणे, शरीरातील तापमान, संतुलन बिघडणे या साऱ्यातून आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात सर्दी, खोकला, छाती भरणे, पोट फुगी, ताप येणे अशी लक्षणे घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
शहरातील दाटीवाटीची वस्ती किंवा उपनगरात रुग्ण संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे तेथील क्लिनिकच्या बाहेर सकाळी-सायंकाळी रुग्णांच्या रांगा दिसत आहेत, तर गंभीर अवस्‍था असलेले रुग्ण शासकीस रुग्णालय, सीपीआर किंवा सेवा रुग्णालयातही उपचारांसाठी येत आहेत.

कोट
वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. बहुतांशी रुग्णांना दिसणारी लक्षणे नियमित आहेत. मात्र, वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. चिंतेचे कारण नाही.
- डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय


कोट
ऋतुमान बदलताना थंडी संपून अचानक उन्हाच्या झळा वाढल्या. यातून शरीरातील तापमान बदलते. रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते. अशा स्थितीत थंडगार पाणी, बर्फ घातलेले सरबत रस, ज्यूस पिण्याचे प्रमाण वाढत आहे. उन्हामुळे धुळी कण वाढलेले असतात. त्यातून श्‍वसना वाटे अतिधुळीकण शरीरात गेल्यास संसर्ग वाढतो. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत आहेत. ही नियमित लक्षणे उपचाराने बरी होणारी लक्षणे आहेत.
- डॉ. अजित लोकरे, सीपीआर, कान-नाक-घसा विभाग प्रमुख