सीपीआर सफाइ कामगार उपोषण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीपीआर सफाइ कामगार उपोषण
सीपीआर सफाइ कामगार उपोषण

सीपीआर सफाइ कामगार उपोषण

sakal_logo
By

‘त्या’ सफाई कामगारांचे
बेमुदत साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. २८ ः सीपीआर हॉस्पिटलमधील सफाई ठेका चालवणाऱ्या कंपनीने सफाई कामगारांना कामावर घ्यावे यासह विविध मागण्यांसाठी महिला सफाई कामगारांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले. सर्व श्रमीक संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
गेल्या तीन महिन्यापूर्वी कंपनीकडे १६ सफाई कामगारांना कामावरून कमी केले होते. या कामागारांना कामावर घ्यावे तसेच सर्व सेवाकाळाचा किमान वेतनाचा फरक मिळावा त्या फरकावरील भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरावी आदी मागण्यासाठी सफाई कामगार गेल्या तीन महिन्यापासून कंपनीकडे तसेच सीपीआरकडे पाठपुरावा करीत आहेत. तरीही कामावर न घेतल्याने श्रमीक संघाच्या नेतृत्वाखाली लता कांबळे या उपोषणास बसल्या आहेत. त्यांच्यासोबत रूपाली बराले, रेखा पाटील, वर्षा कांबळे, शारदा बिरनगे यांनी आंदोलन स्थळी उपस्थित होत्या.
सफाई कामगारांनी कायदेशीर नोटीस देऊन काम बंद आंदोलन केले होते तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी सफाई कामगारांनी काम सुरू करावे, किमान वेतन केले जाईल. तुम्ही काम सुरू करा असे आदेश दिले होते. मात्र, प्रत्यक्षात कंपनीने १६ कामगारांना कामावर घेतलेले नाही. त्यामुळे सफाई कामगारांनी बेमुदत उपोषण सुरू केले.
येत्या चार दिवसात कामगाराना कामावर न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ही यावेळी कामगारांनी दिला आहे. संघाचे सचिव आप्पा कुलकर्णी यांनी सांगितले.