भटकी कुत्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटकी कुत्रे
भटकी कुत्रे

भटकी कुत्रे

sakal_logo
By

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी नवे केंद्र
प्रशासकांचे आदेश ः महापालिका प्रशासन, प्राणिप्रेमींची संयुक्त बैठक

कोल्हापूर, ता. २८ ः भटक्या कुत्र्यांची गणना करावी तसेच कुत्रा निर्बीजीकरण केंद्रावर देखरेख समिती नेमावी व कुत्रा निर्बीजीकरण नवीन सेंटर उभारण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश आज महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिले.
इचलकरंजीसह अन्य ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांनी उन्माद माजवला आहे. इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला जीव गमावावा लागला. कोल्हापूर महापालिका हद्दीतही भटक्या कुत्र्यांचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर महापालिका आरोग्य विभागामार्फत भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी व याबाबत प्राणिप्रेमी यांच्या तक्रारीबाबत महापालिकेत दुपारी संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपआयुक्त रविकांत आडसूळ, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, माजी नगरसेवक किरण नकाते, सर्व प्राणिप्रेमी संस्था व नागरिक उपस्थित होते.
यावेळी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्या सोडविण्यासाठी, कुत्री पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी असावेत, नियमित पशुवैद्यकीय डॉक्टर, चांगल्या प्रतीचे खाद्य व कुत्र्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी, अशी मागणी प्राणिमित्र संघटनांच्या प्रतिनिधींनी केली. उपआयुक्त आडसूळ यांनी भटक्या कुत्र्यांबाबत एक शास्त्रोक्त कार्यपद्धती ठरविण्यात येईल, असे सांगितले. डॉ. पठाण यांनी भटक्या कुत्र्यांबाबत असलेल्या कायद्यातील तांत्रिक बाबी सर्वांना सांगितल्या.