अंतर्गत चौकशी समिती स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंतर्गत चौकशी समिती स्थापन
अंतर्गत चौकशी समिती स्थापन

अंतर्गत चौकशी समिती स्थापन

sakal_logo
By

गायींच्या मृत्यू प्रकरणी अंतर्गत
चौकशी समिती स्थापन ः डॉ. पठाण
कोल्हापूर, ता. २८ : कणेरी मठावरील गायींच्या मृत्यू प्रकरणी अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी आज दिली. पाच जणांची ही समिती असून, त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाकडे पाठविला जाणार आहे.
सुमंगलम पंचमहाभूत महोत्सव सुरू असताना भाकरी, चपाती खायला दिल्याने गोशाळेतील काही गायी अस्वस्थ झाल्या. पोटात आम्लता निर्माण झाल्याने १२ गायींचा मृत्यू झाला होता. काही गायींवर तत्परतेने उपचार करण्यात आले. तीन गायींचे मृतदेह विच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. रोग अन्वेषण प्रयोगशाळेकडून त्याचा अहवाल काल (ता. २७) पशुसंवर्धन विभागाला मिळाला. गायींचा मृत्यू पोटात आम्लता निर्माण झाल्याचे निदान झाले असले, तरी गायींना भाकरी, चपाती कोणी खायला दिली, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी होत आहे. त्याचा परिणाम म्हणून पाच जणांची समिती स्थापन केली. यात पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. पठाण, जिल्हा परिषदेचे पशुसवंर्धन अधिकारी डॉ. विनोद पोवार, पशुवैद्यक डॉ. सॅम लुद्रीक यांच्यासह अन्य दोघांचा यात समावेश आहे. ही समिती मृत्यूचे नेमके कारण शोधून त्याचा अहवाल लवकरच पशुसंवर्धन विभागाकडे पाठविणार आहे.