ई-फायलींग- बार असो. विशेष सभा

ई-फायलींग- बार असो. विशेष सभा

85960

स्वतंत्र यंत्रणेशिवाय सक्ती नको
ई-फायलींगबाबत ‘जिल्हा बार’ सभेत ठराव; नेटवर्कबाबत १० मार्चला मोर्चा

कोल्हापूर, ता. २८ : जिल्हा व तालुका न्यायालयात ई-फायलींगबाबत स्वतंत्र यंत्रणा उभा केल्याशिवाय सक्ती करू नये, असा ठराव आज झालेल्या जिल्हा बार असोसिएशनच्या सभेत झाला. अध्यक्षस्थानी असोसिएशनचे ॲड. गिरीश खडके उपस्थित होते. बीएसएनएलकडून नेटवर्कमध्ये सुधारणा न झाल्यास १० मार्चला त्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचाही निर्णय झाला.
सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत दावे ई-फायलिंगद्वारे दाखल करण्यासाठी परिपत्रक काढले. परंतु जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात ई-फायलिंगबाबत स्वतंत्र यंत्रणा नसल्याने ते अडचणीचे ठरले आहे. याबाबत आज जिल्हा न्यायालयातील जिल्हा बार असोसिएशनची सर्वसाधारण सभा झाली. प्रस्तावना आणि विषयांचे वाचन ॲड. संदीप चौगुले यांनी केले. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲड. विवेक घाटगे यांनी जिल्हा व तालुका न्यायालयात जोपर्यंत ई-सेवा सुविधा केंद्राची उभारणी न्यायव्यवस्थेमार्फत होत नाही, तोपर्यंत ई-फायलिंग सक्ती करू नये. याचवेळी सर्व ॲड. अशोक पाटील, प्रशांत चिटणीस, रणजित गावडे, संपतराव पवार, प्रकाश मोरे, विजय महाजन, आर. बी. पाटील, सर्जेराव खोत यांनी मत व्यक्त केले. ई-फायलिंग अनिवार्य करीत असताना न्यायव्यवस्थेने ई-सुविधा केंद्र उभारावे. त्यामध्ये लॅपटॉप, स्कॅनर, नेटवर्क द्यावे. तरच सक्ती करावी. तोपर्यंत कामे मॅन्युअली करण्यास परवानगी द्यावी. असा ठराव झाल्याचे अध्यक्ष ॲड. खडके यांनी जाहीर केले. उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, करण पाटीलसह सभासद उपस्थित होते. सुशांत चेंडके यांनी आभार मानले.
------------
या आहेत मागण्या...
ई-फायलिंग सुविधा केंद्रात जिल्ह्याला १० व प्रत्येक तालुका ठिकाणी २ असा स्टाफ उपलब्ध करावा. नेटवर्क सर्व्हरची समस्या आहे. ई-फायलिंगमुळे पक्षकारांचा खर्च वाढणार आहे. ई-फायलिंगबाबत ट्रेनिंग देणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com