जुनी पेन्शन योजना मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुनी पेन्शन योजना मोर्चा
जुनी पेन्शन योजना मोर्चा

जुनी पेन्शन योजना मोर्चा

sakal_logo
By

जुनी पेन्शन मोर्चासाठी लाखावर कर्मचारी
येणार ः समन्वय समितीची बैठक

कोल्हापूर ः शासनाने १९८२ ची जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता. ४) भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात सुमारे एक लाख सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होणार आहेत. सकाळी अकरा वाजता गांधी मैदान येथून आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महामोर्चा यशस्वीपणे पार पाडण्याचा निर्धार शासकीय, निमशासकीय कर्मचारी, शैक्षणिक व्यासपीठ समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आला. अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या बैठकीत अनिल लवेकर, भरत रसाळे, एस. डी. लाड, वसंत ढावरे, प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मार्गदर्शन केले. सरकारने मोर्चाची दखल घेतली नाही तर १४ मार्चपासून बेमुदत संप केला जाणार आहे. यावेळी सतीश बर्गे, सुरेश कांबळे, सर्जेराव सुतार, गौतम वर्धन आदी उपस्थित होते. गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाव्दार रोड, पापाची तिकटी, महापालिका, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चाचा मार्ग आहे. या मोर्चात सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक संघटना, विद्यापीठ सेवक संघ आदी संघटना सहभागी होणार आहेत.