दोन दुचाकी चोरटे अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन दुचाकी  चोरटे अटक
दोन दुचाकी चोरटे अटक

दोन दुचाकी चोरटे अटक

sakal_logo
By

86017
...
दुचाकी चोरणाऱ्या दोघांना अटक; तीन दुचाकी जप्त


कोल्हापूर, ता. २८ ः चोरलेल्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून ३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. सचिन हणुमंत नागणे (वय ४१, रा. बिजली चौक, जवाहरनगर), विनोद सर्जेराव मुसळे (३२, रा. अतिग्रे, हातकणंगले) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार विशाल खराडे यांना काही दुचाकी चोरटे राजारामपुरीतील ९ क्रमांक शाळेजवळ येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शाळेच्या परिसरात सापळा लावला. सकाळी ११.३० च्या सुमारास दोन तरुण दुचाकीवरून येथे आले. त्यांना पोलिसांनी थांबवले आणि त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची दुचाकी चोरीची असल्याचे लक्षात आले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची दुचाकी पोलिसांनी जप्त केली. या दोघांकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन दुचाकी चोरल्याचे सांगितले. यातील एक दुचाकी शाळेच्या भिंतीजवळ लावलेली होती. आणखी एक दुचाकी चोरली असल्याचे त्यांनी सांगितले. या तीनही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. यातील एक दुचाकी टाकाळा परिसरातून त्यांनी रविवारी (ता. २६) दुपारी चोरली होती. दुसरी दुचाकी हातकणंगले तालुक्यातील रुई गावातील म्हसोबा माळ येथून शुक्रवारी (ता.२४) चोरली होती. तर वडगाव येथील अंबप येथून २० सप्टेंबरला तिसरी दुचाकी चोरली होती. या तीनही दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक बी. बी. शिंदे, अमर आडुळकर, नितीन मेश्राम, विशाल शिरगांवकर, रविकुमार आंबेकर यांनी केली.