प्रामाणिकपणे १५ हजार रुपये रिक्षाचालकाने परत केले. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रामाणिकपणे १५ हजार रुपये रिक्षाचालकाने परत केले.
प्रामाणिकपणे १५ हजार रुपये रिक्षाचालकाने परत केले.

प्रामाणिकपणे १५ हजार रुपये रिक्षाचालकाने परत केले.

sakal_logo
By

प्रामाणिकपणे १५ हजारांची रक्कम परत
कोल्हापूर, ता. २८ ः बँकेच्या एटीएममध्ये मिळालेली १५ हजारांची रक्कम रामचंद्र मारुती पाटील (रा. पिशवी, ता. शाहूवाडी) यांनी प्रामाणिकपणे परत केली. याबद्दल लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पाटील त्यांचा सत्कार झाला. सोमवारी (ता. २७) सकाळी लक्ष्मीपुरीत ही घटना घडली.
लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधून विश्वजीत हणमंत पाटील (रा. वडणगे, ता. करवीर) यांनी रक्कम काढून नोटांचे बंडल कौंटरवर ठेवले. त्यानंतर ते तसेच गेले. ऑफिसमध्ये गेल्यावर बंडल विसरल्याचे लक्षात आले. त्यांनी बँकेतील अधिकाऱ्यांना प्रकार सांगितला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये रक्कम घेऊन एकजण बाहेर पडल्याचे दिसले. ही व्यक्ती रामचंद्र पाटील असल्याचे कर्मचाऱ्यांनी ओळखले. त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सोमवारी लक्ष्मीपूरी पोलिस ठाण्यात रक्कम विश्वजीत यांच्याकडे सुपूर्त केली. रामचंद्र टेम्पोचालक आहेत. यावेळी बँक अधिकारी अजयकुमार स्वामी, ए. बी. पाटील, विकास देसाई, संतोष बेडकेंसह पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात, रोहित मर्दाने, मुरलीधर रेडेकर, पूनम माळगे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.