राष्ट्रवादी कॉंग्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी कॉंग्रेस
राष्ट्रवादी कॉंग्रेस

राष्ट्रवादी कॉंग्रेस

sakal_logo
By

अधिवेशनात पक्षातील आमदारांवर
अजित पवार यांची बारीक नजर
महेश जगताप : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अधिवेशनातील हजेरीवर विरोधी पक्षनेते अजित पवार जातीने लक्ष घालत आहेत व दिवसातून तीन वेळा पक्षाच्या हजेरीपटावर आमदारांना स्वाक्षरी करावी लागते. हा हजेरीपट विधानभवनात सदस्यांची हजेरी वाढवण्यासाठी केलेला आहे, असेही पक्षातील एका आमदाराने सांगितले.
सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले; मात्र अधिवेशनात बऱ्याच वेळा आमदार, मंत्री गैरहजर राहतात किंवा सकाळच्या सत्रात येऊन दुपारी निघून जातात. त्यामुळे संपूर्ण अधिवेशनात काही ठराविक आमदार, मंत्रीच पूर्णवेळ बसतात. यामुळेच पवार यांनी दिवसातून तीन वेळा हजेरीपटावर स्वाक्षरी करून जास्ती जास्त आमदारांनी अधिवेशनास पूर्णवेळ हजर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
पक्षाच्या आमदारांना सकाळी अकरा, दुपारच्या सत्रात दोन आणि अधिवेशनाचा दिवस संपल्यावर एकदा असे स्वाक्षरी करण्याचे वेळापत्रक आहे. दिवसभर आमदारांनी उपस्थित राहिले पाहिजे, यासाठी अजित पवार यांचा आग्रह आहे. त्यांनी त्यासाठी खास हजेरी नोंदवून घेण्यासाठी वेगळा माणूस ठेवला आहे. अधिवेशनातील आजच्या कामकाजात अजित पवार सकाळपासून अधिवेशन संपेपर्यंत पूर्णवेळ हजर होते. आज बरेच आमदार व मंत्री यांची अनुपस्थिती होती.