गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

शिंदे शिक्षणशास्त्रमध्ये विज्ञान दिन
गडहिंग्लज : येथील दिनकरराव शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा करण्यात आला. डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. डॉ. टी. वाय. पटेल अध्यक्षस्थानी होते. पोस्टर प्रदर्शन व रांगोळी प्रदर्शनात भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थींना बक्षीस देवून गौरविण्यात आले. यावेळी पटेल यांनी वैद्यकीय क्षेतात विज्ञानाचा उपयोग करुन व्यक्तीचे आरोग्य चांगले कसे ठेवता येईल याचा विचार होवू शकतो असे मत मांडले. प्रशिक्षणार्थी प्रसाद शिंदे-परीट व शीतल सुर्वे यांनी विज्ञान दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. आशा गडकरी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. शिवाजी रायकर यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कादंबरी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ओंकार पाटील यांनी आभार मानले.
--------------------
शिवराज स्कूलमध्ये संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील शिवराज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी राजभाषा व राष्ट्रीय विज्ञान दिन असा संयुक्त कार्यक्रम झाला. शरद कांबळे यांनी मराठी भाषेचे, तर सौफिया मकानदार हिने विज्ञान दिनाविषयी माहिती दिली. यावेळी काही विद्यार्थ्यानी गीत गायन केले. मराठी दिनासंदर्भात रॅली काढली. दुपारच्या सत्रात विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. दिग्विजय कुराडे यांच्याहस्ते झाले. संदीप गवळी, योगेश चौगुले उपस्थित होते. मुख्याध्यापिका गौरी शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले. दिपीका यादव यांनी आभार मानले.
------------------
क्रिएटिव्हमध्ये विज्ञान दिन
गडहिंग्लज : येथील क्रिएटिव्ह हायस्कूल व कॉलेज ऑफ सायन्समध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर देसाई अध्यक्षस्थानी होते. सचिव आण्णासाहेब बेळगुद्री प्रमुख पाहुणे होते. डॉ. देसाई यांनी तरुणांनी विज्ञानाचा वापर करुन प्रदुषणमुक्त भारत बनविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. बेळगुद्री यांनी विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा सखोल अभ्यास करुन स्वत:मधील शोधकवृत्ती जागृत ठेवण्याचे आवाहन केले. प्रांजल पुजारी, सिद्धेश शिंदे, अर्पिता सागर यांनी विविध संशोधकांची माहिती दिली. मुख्याध्यापक दिनकर रायकर, सर्व शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. प्रणव पाटील याने स्वागत केले. वैष्णवी कांबळे, जोया मकानदार यांनी सूत्रसंचालन केले. तनिका देवेकर हिने आभार मानले. विज्ञान शिक्षकांनी नियोजन केले होते.
------------------------
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये कवितांचे वाचन
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक सुनील कांबळे यांच्याहस्ते झाले. मराठी कवितांचे वाचन झाले. चैतन्य शिंदे, सई सावंत, अपूर्वा छज्जागोळ, स्नेहा जरळी, प्रचिती कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य पंडीत पाटील यांनी कुसुमाग्रज यांच्याविषयी माहिती दिली. एस. आर. नाईक, लता पाटील यांची भाषणे झाली. मोहन कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. देवानंद कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com