शिवराज कॉलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवराज कॉलेज
शिवराज कॉलेज

शिवराज कॉलेज

sakal_logo
By

फोटो क्रमांक : gad११.jpg
86035
गडहिंग्लज : घाळी महाविद्यालयातील कार्यक्रमात अनिल चौगुले यांचे व्याख्यान झाले.
---------------------------------------------------
समतोल आहारासाठी भरड धान्य वापरा
अनिल चौगुले ; गडहिंग्लजला घाळी महाविद्यालयात व्याख्यान

गडहिंग्लज, ता. १ : रोजच्या आहारात भरड धान्याचे (तृणधान्य) महत्त्व अनन्यसाधारण आहे. समतोल आहार मिळवायचा असेल तर भरड धान्याचा वापर रोजच्या आहारात होणे आवश्यक आहे, असे मत कोल्हापूरचे निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी व्यक्त केले.
येथील डॉ. घाळी महाविद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. चौगुले यांनी व्याख्यानात ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरे, डाळी आदी तृणधान्यांची शेती कशी करावी, या धान्याचे गुणधर्म, आहारातील महत्त्व, इतर उत्पादने आणि त्याचा व्यवसाय कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. या विषयाशी निगडित विद्यार्थ्यांच्या शंकांचे त्यांनी निरसनही केले.
प्राचार्य पाटील यांनी तापमान वाढीमुळे आरोग्यावर होणारा परिणाम व तृणधान्यांची शरीरासाठी असणारी गरज याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील भित्तीपत्रिका व प्रयोगांची मांडणी केली होती. यावेळी शिवाजी विद्यापीठातंर्गत झालेल्या आविष्कारमध्ये राज्यस्तरावरील विजेते लक्ष्मीकांत वरदापगोळ तसेच गणित विभागातर्फे झालेल्या विविध स्पर्धेतील विजेते दीप्ती पाटील, निकिता पाटील, सानिका जाधव, पूजा नेवडे यांचा गौरव झाला. डॉ. राजाराम सावंत यांनी स्वागत केले. प्रा. तेजश्री कानकेकर व प्रा. सिया हिडदुग्गी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. किरण पाटील यांनी आभार मानले. डॉ. शिवानंद मस्ती, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. विश्‍वास बाबर, प्रा. अश्‍विन गोडघाटे, प्रा. राधिका हुलगबाळी, प्रा. सोनाली सोनाळकर, प्रा. महेश कदम यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.