गड-योग विद्या धाम कार्यक्रम

गड-योग विद्या धाम कार्यक्रम

86038
निरोगी जीवनासाठी जीवनशैली बदला
सुबोध पाटील; गडहिंग्लजला योग विद्या धामतर्फे कार्यक्रम

गडहिंग्लज, ता. १ : सध्याचे युग स्पर्धेचे आहे. या युगात आचार, विचार बिघडल्याने वृत्ती बिघडली आहे. शरीरही आजारांनी ग्रासलेले आहे. निरोगी जीवन जगायचे असेल तर चुकीची जीवनशैली बदलणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सुबोध पाटील (चंद्रपूर) यांनी केले.
येथील योग विद्या धामतर्फे कार्यक्रम झाला. याप्रसंगी ‘निरोगी जीवन’ विषयावर श्री. पाटील बोलत होते. दत्तात्रय बरगे अध्यक्षस्थानी होते. सुपर मार्केटमधील सभागृहात कार्यक्रम झाला.
श्री. पाटील म्हणाले, ‘पोट नरम, पाय गरम व डोके थंड ठेवले तर आरोग्य उत्तम ठेवू शकतो. स्वत:च डॉक्टर झाले पाहिजे. याचे सर्व शिक्षण खेड्यामध्ये मिळते. खेड्यांनी संस्कृती जपून ठेवली आहे. खेड्यामध्ये शुद्ध पाणी, शुद्ध हवा व सात्विक आहार मिळतो. त्यामुळेच अनेक संतांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला.’
नाडी व नाभी चिकीत्सक दयानंद मोरे यांनी गोशाळेचे महत्त्व सांगितले. अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल दत्तात्रय बरगे, राजेंद्र हत्ती यांचा सत्कार झाला. सदानंद वाली यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. शंकर खाडे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. दादा मांडवकर, गणपती बडदारे, संतान बारदेस्कर, शिवाजी नेवडे, उज्ज्वला वंदाळे, तेजस्विनी जगदाळे, गुरुलिंग खंदारे उपस्थित होते. शिवगोंडा खापरे यांनी आभार मानले. अरविंद सावळगी यांच्या विश्वकल्याण प्रार्थनेने सांगता झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com