गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या
गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

86039
कोल्हापूर : जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे पार्वती हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार प्रदान करताना संजयसिंह चव्हाण. व्यासपीठावर दीपक देवलापूरकर, डॉ. योगेश साळे, एकनाथ आंबोकर आदी.

पार्वती हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्कार
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलला आदर्श शाळा पुरस्काराने गौरविण्यात आले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. जनस्वास्थ्य समितीतर्फे आरोग्य व पर्यावरण जागृतीसाठी माध्यमिक शाळा स्तरावर जनस्वास्थ्य अभियान राबविण्यात आले होते. त्यातून पार्वती हायस्कूलची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले. सुरेश संकपाळ अध्यक्षस्थानी होते. दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे आदी उपस्थित होते.
---------------
कौलगे शाळेत विज्ञान प्रयोग प्रदर्शन
गडहिंग्लज : कौलगे (ता. गडहिंग्लज) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन मांडले होते. भावेश्‍वरी सेवा संस्थेचे अध्यक्ष महेश शेट्टी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. मुख्याध्यापिका सौ. एस. एस. इनामदार यांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात 35 प्रयोग मांडले होते. त्यांचे निरीक्षण करुन निष्कर्ष काढले. प्रयोग स्वत: केल्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीसाठी मदत झाली. दीपक सावंत यांनी सूत्रसंचालन केले. सुनील माने यांनी आभार मानले. नामदेव यादव, स्वाती पाटील, बळीराम पाटील, सुरेखा नंदनवाडे, विश्वजीत चव्हाण, बाळासाहेब मोहिते, दुंडाप्पा कांबळे, गजानन काटकर आदी उपस्थित होते.
------------------
शिंदे हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
गडहिंग्लज : येथील सौ. वि. दि. शिंदे हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक डी. व्ही. चव्हाण अध्यक्षस्थानी होते. त्यांच्या हस्ते डॉ. सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. एस. एस. खोराटे यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगितले. दीपाली पाटील, अनुष्का जोशी, आयुष कांबळे यांनी डॉ. रामण यांच्या कार्याची माहिती दिली. एस. व्ही. चव्हाण, जे. एम. भदरगे, आर. बी. माने आदी उपस्थित होते. राधा गंबरे यांनी सूत्रसंचालन केले. ए. जे. हराडे यांनी आभार मानले.
---------------
पार्वती हायस्कूलमध्ये संयुक्त कार्यक्रम
गडहिंग्लज : औरनाळ (ता. गडहिंग्लज) येथील पार्वती हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा गौरव दिन असा संयुक्त कार्यक्रम झाला. पी. व्ही. माने व माया पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. आठवी व नववीच्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्रीयन वेशभूषा केली होती. वि. वा. शिरवाडकर व डॉ. सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पुजन झाले. आर्या मोरे, प्राची संभाजी, भाग्यश्री नाईक, अक्षता सावंत, भक्ती सुतार यांची भाषणे झाली. सबिया शेख, पुनम गवळी, मानसी परीट, प्राची नार्वेकर, वैशाली मोरे या विद्यार्थिनींनी मराठी भाषा गौरव गीत सादर केले. श्रीमती माने व सौ. पाटील यांनी मराठी भाषेचे महत्व सांगितले. मुख्याध्यापक एस. एन. तांबे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रिया सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यु. पी. सावंत यांनी आभार मानले.