Sun, May 28, 2023

-
-
Published on : 1 March 2023, 1:12 am
गडहिंग्लज हायस्कूलमध्ये
प्लास्टिक बंदी कार्यक्रम
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात प्लास्टिक बंदी या विषयावर कार्यक्रम झाला. वसुंधरामित्र मिलिंद पगारे यांनी प्लास्टिक का वापरू नये, याची माहिती दिली. पर्यावरणदूत प्रा. अनिल मगर यांनी प्लास्टिक प्रदूषण हटवा, जीवन वाचविण्याचा संदेश दिला. हरियाना बार्देसकर (कुडाळ), मुख्याध्यापक पंडित पाटील यांचीही भाषणे झाली. वैजनाथ पालेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कांबळे यांनी आभार मानले.