आवश्यक- संक्षिप्त

आवश्यक- संक्षिप्त

86163
युको बँकेचे कार्यालय शाहूपुरीत स्थलांतर
कोल्हापूर ः येथील युको बँकेचे कार्यालय शाहूपुरी व्यापारी पेठ येथे स्थलांतरित करण्यात आले. या स्थलांतरित शाखेचे उद्‌घाटन बँकेचे प्रबंध निदेशक व मुख्य कार्यपालन अधिकारी सोनाशंकर प्रसाद, सुभाशिनी प्रसाद यांच्या हस्ते झाले. सोना प्रसाद यांनी रिटेल व व्यापारी वर्गाला कर्ज देण्यात भर द्यावा, असे मत व्यक्त केले. यावेळी युको बँकेच्या पुणे अचल कार्यालयाचे प्रमुख जयदीप नंदी, विजय गंधे, शाखा व्यवस्थापक एम. भानू चंदर, विशाल गिते, मारुती शिंदे, अशोक पाटील आदी उपस्थित होते.
.......
86247
जयेश ओसवाल यांना पुरस्कार प्रदान
कोल्हापूर ः भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्यातून आजही सर्वांनाच प्रेरणा मिळते. भावी पिढीनेही हे काम जाणून घ्यावे, असे मत आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. मुंबई येथे झालेल्या एपीजे अब्दुल कलाम भारत पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, या कार्यक्रमात येथील चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेश ओसवाल यांना सामाजिक कार्याबद्दलच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्यासह अमिताभ गुप्ता, लेफ्टनंट कर्नल सलील जैन, मेजर जनरल विक्रमदेव डोगरा, प्रसिद्ध गायक उदित नारायण, अभिनेत्री पूनम झंवर, अभिनेते नितीश भारद्वाज, अभिनेता अभिजित लहरी, रणजीपटू विशाल महाडिक, पॉप सिंगर शिवानी कश्यप आदींचा गौरव झाला. प्रास्ताविक सोनिया मेयरस यांनी केले. पौर्णिमा कुलकर्णी यांनी आभार मानले.
...........
86249
प्राचार्य खेबूडकर यांना डॉ. मोराळे स्मृती पुरस्कार
कोल्हापूर ः येथील वनौषधी विद्यापीठ संस्थेतर्फे देण्यात येणारा पहिला डॉ. अरुण मोराळे स्मृती समाजभूषण पुरस्कार चेतना विकास मंदिराचे माजी प्राचार्य आणि चेतना अपंगमती संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य पवन खेबूडकर यांना जाहीर झाला आहे. विशेष मुलांच्या शिक्षण व पुनर्वसन क्षेत्रात श्री. खेबूडकर यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्याची दखल घेऊन पुरस्कार दिल्याची माहिती डॉ. दिलखूष तांबोळी, डॉ. ऋषीकेश जाधव, डॉ. प्रणव पाटील यांनी दिली.
डॉ. मोराळे शासकीय सेवेत असतानाच त्यांनी आपल्या सेवाभावी संस्थेतर्फे वैद्यकीय सेवा, माता-बाल संगोपन, एड्सग्रस्तांसाठी प्रबोधनावर भर दिला. सेवानिवृत्तीनंतर १०८ ॲम्ब्युलन्स सेवेचे चार जिल्ह्यांचे झोनल मॅनेजर म्हणून ते कार्यरत होते. रस्ते अपघात व कोरोना काळात त्यांनी विशेष कार्य केले होते. दरम्यान, सोमवारी (ता. ६) ज्येष्ठ उद्योजक एम. बी. शेख यांच्या हस्ते शाहू स्मारक भवनात पुरस्कार वितरण होईल.
..........
86248
प्रकाश लोहार यांचा जनजागृतीपर शाहिरी कार्यक्रम
कोल्हापूर ः शाहीर प्रकाश लोहार यांच्या जनजागृतीपर शाहिरी कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा जागर सुरू आहे. नुकत्याच कणेरी मठ येथे झालेल्या सुमंगल पंचमहाभूत लोकोत्सवातही हा कार्यक्रम झाला. पाणी वाचवा, जंगलतोड थांबवा आदी विषयावर सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने ते प्रबोधन करत आहेत. विभागीय वन अधिकारी विलास काळे, प्रियांका दळवी, तुषार गायकवाड, महादेव मोहिते यांचे त्यांना सहकार्य मिळाले.
...........
86018 (कालच्या टुडे २ शेजारी फोटो आहे)
गंधार बुगलेचे यश
कोल्हापूर ः पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने झालेल्या पोदार इन्स्पायरिंग एक्सलन्स ओलिंपियाड परीक्षेमध्ये श्री समर्थ बालमंदिर शाळेचा विद्यार्थी गंधार रणजीत बुगले याने प्रथम क्रमांक मिळवला. त्याला मुख्याध्यापिका प्राजक्ता जोशी, प्रियांका देसाई, विद्या नलवडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com