
एज्युकेशन दोन बातम्या
राजर्षी शाहू कॉलेजमध्ये शनिवारी
इतिहास विभागाचे राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर, ता. २ : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये शनिवारी (ता. ४) ‘२० व्या शतकामधील भारतातील सामाजिक-राजकीय चळवळी’ यावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. इतिहास विभाग आणि भारतीय सामजिक विज्ञान अनुसंधान परिषदेतर्फे होणाऱ्या चर्चासत्राचे उद्घाटन बळवंत कॉलेज विटा येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्राचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल. डी. कदम आहेत. बीजभाषक म्हणून बेळगावी येथील प्राचार्य आनंद मेणसे मार्गदर्शन करतील. बीजभाषण सत्राच्या अध्यक्षपदी शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भणगे असणार आहेत.
चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठातील इतिहास अधिविभागाचे विभागप्रमुख डॉ. अवनिश पाटील हे ‘स्वातंत्र्य चळवळीतील काही दुर्लक्षित पैलू’, डॉ. टी. एस. पाटील हे ‘महाराष्ट्रतील समाजसुधारणा चळवळीतील फलश्रुती’ यावर मार्गदर्शन करतील. या सत्रासाठी प्रा. डॉ. अरुण भोसले हे अध्यक्षपदी असतील. समारोप सत्रासाठी उपप्राचार्या प्रा. डॉ. सिंधू आवळे आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सरोज पाटील, जनरल बॉडी सदस्य प्रशांत पाटील, जनरल बॉडी सदस्या संगीता पाटील, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एम. बी. शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अजित पाटील, विक्रांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. समन्वयक म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. सुप्रिया खोले काम पाहत आहेत.
...
शाहू कॉलेजमध्ये विज्ञान दिन
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन झाला. सायन्स असोसिएशन आणि ‘आयक्युएसी’तर्फे विविध उपक्रम घेतले. विविध संशोधन प्रकल्प हाती घेऊन त्यावरील पोस्टर प्रदर्शन घेतले. विविध संशोधन विषयावरील ४७ पोस्टरचे सादरीकरण केले. डी. वाय. पी. युनिव्हर्सिटी येथील प्रा. आर. एस. पाटील यांचे ‘फाउंडेशन ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ यावर व्याख्यान झाले. प्रा. पाटील यांनी विद्यार्थांना विज्ञानातील नावीन्यपूर्ण शोधांची माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी भौतिक शास्त्रातील रमन इफेक्ट, बायो सेंसर, दृष्टीहीन व्यक्तींना बायोलेंसद्वारे दृष्टी देणे आदी शोधांची माहिती सांगितली. प्रा. पी. एस. चौगुले अध्यक्षस्थानी होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शकील शेख, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. पी. बी. पिस्ते उपस्थित होते. डी. ए. माळवेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्राचार्य डॉ. एल.डी. कदम, उपप्राचार्य प्रा. डॉ. व्ही. व्ही. किल्लेदार यांनी मार्गदर्शन केले. सायन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर गायकवाड यांनी स्वागत केले. डॉ. एस. पी. पवार यांनी आभार मानले.