दंड व्याज सवलत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंड व्याज सवलत
दंड व्याज सवलत

दंड व्याज सवलत

sakal_logo
By

सवलत योजनेच्या
शेवटच्या दिवशी
३ कोटी ६९ लाख जमा

कोल्हापूर ः घरफाळा थकीत रकमेवरील ५० टक्के दंडव्याज सवलत योजनेंतर्गत मंगळवारी शेवटच्या दिवशी तीन कोटी ६९ लाखांचा घरफाळा जमा झाला. चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एकरकमी भरणा केल्यास थकबाकीच्या दंड व्याजामध्ये २८ फेब्रुवारीअखेर ५० टक्के सवलत जाहीर केली होती. ६३५८ करदात्यांनी १३ कोटी ११ लाख ३ हजारांची थकीत रक्कम महापालिकेकडे जमा केली. २८ फेब्रुवारीला रात्री १२ पर्यंत ३ कोटी ६९ लाख ८४ हजार रक्कम जमा झाली. १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ अखेर ९४३३३ करदात्यांकडून ६५ कोटी ४ लाख ३६ हजार रक्कम जमा झाली आहे. १ ते ३१ मार्चअखेर ४० टक्के सवलत सुरू झाली आहे. त्याचा जास्तीत जास्त करदात्यांनी लाभा घ्यावा, असे आवाहन प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.