बांधकाम कॅम्प

बांधकाम कॅम्प

३४ प्रकरणे
नगररचनाच्या
कॅम्पमध्ये मंजूर

कोल्हापूर ः महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कॅम्पमध्ये आज ३४ प्रकरणे मंजूर करण्यात आली. त्यात २९ प्रकरणे विकास परवानगीची तर अनामत रक्कम परत देण्याची पाच प्रकरणे होती. भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजुरी, एकत्रिकरण व विभाजन आदी कामाकरिता नगररचना कार्यालयामध्ये कॅम्पचे आयोजन केले होते. २९ प्रकरणांमध्ये बांधकाम परवानगीची सात, भोगवटाची पाच, आदेशाची दहा, रेखांकनाची चार तर मुदतवाढीची तीन होती. कॅम्पमध्ये उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंत्यांनी कामे तपासून सादर केली. यापुढे नगररचना कार्यालयामार्फत विकास परवानगी प्रकरणासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com