सतेज पाटील विधानपरिषद मागणी

सतेज पाटील विधानपरिषद मागणी

एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्‍न
मार्गी लावा ः सतेज पाटील
निराधार योजनेतील जाचक अटी शिथिल करा
राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी व उत्पादनासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. कामगार करार थकीत रक्कम लवकरच जमा केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत याबाबतचा प्रश्‍न विचारल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.
महामंडळाला शासनाकडून गेल्या पाच महिन्यांपासून अपुरा निधी मिळतो. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात केलेल्या रकमेचा हिस्सा ६५० कोटी भविष्य निर्वाह निधी व उपदान ट्रस्टकडे जमा झाला नसल्याचे निदर्शनास आले आहे. ट्रस्टला त्यापोटी मिळणारे व्याज १२ ते १५ कोटी रुपये मिळाले नसून ट्रस्ट अडचणीत आहे. मागील दोन वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची किती थकबाकी प्रलंबित असून त्यापैकी किती थकबाकीची रक्कम अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांना अदा करण्यात आली आहे. किती निवृत्त कर्मचाऱ्यांना कुटुंब निवृत्तीवेतनाचा लाभ देण्यात आला आहे व किती प्रकरणे प्रलंबित आहेत, असे प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
महामंडळाकडून या रकमा ट्रस्टकडे भरण्यास विलंब होत असला तरी कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या कपातीवर पूर्ण व्याज देण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत ७ हजार ९३७ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचारी यांची डिसेंबर २०२२ अखेर १४८ कोटी ४१ लाख रुपये रक्कम प्रलंबित आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दोन वर्षांत १११ कोटी १४ लाख रुपयांची रक्कम अदा करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य शासनाच्या संजय गांधी श्रावणबाळ व अपंग यासारख्या विविध निराधारांसाठीच्या योजनांमधील जाचक अटी शिथिल करा, अशी मागणीही सतेज पाटील यांनी केली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी या योजनेतील कोणताही लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com