रस्त्यासाठी कुटूंबासह आंदोलनाचा इशारा

रस्त्यासाठी कुटूंबासह आंदोलनाचा इशारा

GAD24.JPG
86361
गडहिंग्लज : विश्रामबाग कॉलनी रस्त्याच्या मागणीचे निवेदन विश्रामबाग कॉलनीतील नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना दिले.
---------------------------------------------------------------------
रस्त्यासाठी कुटुंबासह आंदोलनाचा इशारा
विश्रामबाग कॉलनी रस्ता; पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : कडगाव रोडपासून एमएसईबी मंगल कार्यालय, विश्रामबाग कॉलनीकडे जाणारा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला आहे. वेळोवेळी मागणी करूनही या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे आता नागरिकांनी या रस्त्यासाठी कुटुंबासह आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
यासंदर्भात मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांना निवेदन दिले आहे. विश्रामबाग कॉलनीत अनेक घरे आहेत. अर्धा ते पाऊण किलोमीटरचा हा रस्ता आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता उखडलेल्या अवस्थेत आहे. धड चालताही येत नाही, अशी परिस्थिती आहे. लहान मुले, वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून जाताना दिव्य पार केल्यासारखे वाटत आहे. वाहनधारकांनाही कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे मोटारसायकलवरून जाताना नागरिकांच्या हाडांचे विकार वाढत आहेत. वेळोवेळी शिष्टमंडळाद्वारे लेखी मागणी करूनही पालिका याकडे दुर्लक्ष करीत आहे. हा रस्ता तातडीने करण्याची मागणी असून त्याची कार्यवाही न झाल्यास कुटुंबासमवेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवृत्त मेजर जगन्नाथ सावंत, युनूस नाईकवाडे, आर. जी. पाटील, बी. एम. कुंभीरकर, दिनकर कावडकर, सुनीता जक्कन्नावर, नंदिनी पोवार, शीतल पाटील यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनावर अमृत जक्कन्नावर, बाबासाहेब पाटील, आदित्य चौगले, माधुरी कुंभीरकर, सुरेखा मोकाशी, संगीता खोत, संदीप हवालदार, पूनम जगदाळे आदींच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com