वित्त विभागात पदोन्‍नीसाठी लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वित्त विभागात पदोन्‍नीसाठी लगबग
वित्त विभागात पदोन्‍नीसाठी लगबग

वित्त विभागात पदोन्‍नीसाठी लगबग

sakal_logo
By

वित्त विभागात पदोन्‍नतीसाठी लगबग
-
सहाय्‍यक लेखाधिकारी पदाच्या जागा रिक्‍त

कोल्‍हापूर, ता. २ : मार्चच्या सुरुवातीलाच वित्त विभागातील ७ सहाय्‍यक लेखाधिकाऱ्यांना पदोन्‍नती मिळाली आहे. त्यामुळे या जागेवर पदोन्‍नती करण्यासाठी वित्त विभागात लगबग सुरू झाली आहे. अर्थसंकल्‍पीय कामकाज असल्याने चार दिवसांत पदोन्‍नती प्रक्रिया संपवणे आवश्यक आहे. विभागातील कनिष्‍ठ लेखाधिकारी यांना आता सहाय्‍यक लेखाधिकारी या पदावर पदोन्‍नती दिली जाणार आहे. सोयीच्या पोस्‍टींगसाठी जोरदार यंत्रणा कामाला लागली आहे, तर रिक्‍त होणा‍ऱ्या वरिष्‍ठ सहाय्‍यक लेखाधिकारी या पदावरही पदोन्‍नती दिली जाणार आहे.
वित्त विभागातील सहाय्‍यक लेखाधिकारी महावीर सोळांकुरे, वसंत गाडे, वैशाली पवार, सुजाता सोलणकर, झामरू गायकवाड, संजय आपटे, अनिल माळवे यांना लेखाधिकारी (वर्ग २) या पदावर पदोन्‍नती मिळाली आहे, तर सहाय्‍यक लेखाधिकारी संभाजी हंकारे हे निवृत्त झाले असल्याने एकूण सहाय्‍यक लेखाधिकारी पदाच्या आठ जागा रिक्‍त झाल्या आहेत. मार्च महिना हा वित्त विभागासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. वर्षभराची बिले या महिन्यात येत असतात. त्यामुळे येथील एकही जागा रिक्‍त राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाते. त्यादृष्‍टीने सध्या विभागात धावपळ सुरू आहे.